सुधागड : सुधागड तालुक्यातील उंबरवाडी येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पाली पोलीस ठाणे हद्दीत 20 ऑक्टोब 2024 रोजी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पाली रोडवरून उंबरवाडीकडे जाणारा रस्ता, उंबरवाडी येथील बहीरीचेदेवस्थानाचे शेताजवळ असलेली डांबरी रोडचे पुलाचे मोरीमध्ये, सुधागड येथे एका अनोळखी पुरूष जातीचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कशाचे तरी साहययाने खून केला व पुरावा नष्ट करण्याचे हेतूने सदरचे प्रेत जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे आढळून आले आहे.
याबाबत पाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण या करीत आहेत.