Zakir Hussain | झाकीर हुसेन यांना कर्जतमधील तबल्याची भुरळ

आयत्यावेळी रंगलेली संगीतप्रेमींची मैफल; विजय हरिश्चंद्रे यांनी सांगितल्या आठवणी
zakir hussain fascinated by karjat tabla
झाकीर हुसेन यांना कर्जतमधील तबल्याचे आकर्षण होते. Pudhari
Published on
Updated on
माथेरान : मिलिंद कदम

तबला वादनातील महारथी स्वर्गवासी झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर भारतीय संगीत परंपरेची मोठी हानी झाली आहे परंतु याच झाकीर हुसेन यांना कर्जतमधील तबल्याचे आकर्षण होते. ही बाब आता त्यांच्या निधनानंतर समोर आली आहे. रायगडमधील सांस्कृतिक नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या कर्जतमधून त्यांनी तबला घेतल्याची एक नुकतीच आठवण समोर आली आहे.

जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध तबलावादक दिवंगत झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले. परंतु त्यांच्याबाबतची कर्जतची एक आठवण या निमित्ताने पुढे येत आहे. याबाबतची सविस्तर आठवण कर्जतचे ज्येष्ठ नागरिक विजय हरिश्चंद्रे यांनी करून दिली आहे.

झाकीर हुसेन हे त्यांचे स्नेही रवि आरेकर यांच्याकडे कर्जतला आले होते. रात्री आयत्यावेळी संगीतप्रेमींची मैफिल बसली. रवि यांच्याकडे तबले होते. परंतु झाकीर हुसेन यांना हवा तसा तबला आरेकर यांच्याकडे नसल्याने हुसेन यांनी दुसरा तबला उपलब्ध होईल का अशी मागणी केली असता आरेकर यांनी रात्रीच्या वेळी चांगला तबला मिळतो का यासाठी शोध घेतला. त्यावेळी कर्जतमध्ये हरिश्चंद्रे कुटुंब तबला बनविण्याचे काम करीत असल्याने आरेकर यांनी हरिश्चंद्रे यांच्याकडे तबला मिळू शकतो का या उद्देशाने त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

आरेकर आणि हरिश्चंद्रे कुटुंबाचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे हक्काने रात्री रवि आरेकर यांनी हरिश्चंद्रे यांना तबल्याची अडचण सांगितली व एखादा चांगला तबला असेल तर तात्पुरता द्यावा अशी मागणी केली. तेव्हा हरिश्चंद्रे यांनी लगेचच त्यांना आपल्या दुकानातील तयार केलेला एक चांगला तबला दिला व सांगितले की, हा तबला गिर्‍हाईकाच्या ऑर्डरचा आहे. नंतर मला परत आणून द्या.

त्यानंतर दोन दिवसांनी ज्या गिर्‍हाईकाचा तबला होता ते घायला आले. तेव्हा हरिश्चंद्रे यांनी आपल्या दुकानातील माणसाला रवि आरेकर यांचेकडून तबला घेऊन येण्यास पाठवले, त्यावेळी रवि आरेकर यांनी दुकानात येऊन दत्ता हरिश्चंद्रे यांना सांगितले की, झाकीर यांना तो तबला फार आवडला. अतिशय सुंदर तयार केला असल्या मुळे हा तबला मी घेऊन जातो असे झाकिर हुसेन यांनी सांगितले व जे काय पैसे असतील ते त्यांना देऊन टाक, पण हा तबला मला पाहिजे. यावरून उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यावेळी कर्जतमधील तबल्याची जणू भुरळच पडली होती.

कर्जतकर मोठ्या मनाचे

ज्या गिर्‍हाईकाचा तबला होता ते गिर्‍हाईक म्हणजे कर्जत येथील रघुनाथ दगडे यांनी तो तबला विकत घेतला होता. त्यांना सविस्तर सांगितल्यावर, त्यांनाही आनंद वाटला. त्यांनी काही हरकत नाही असे मोठ्या मनाने सांगितले. त्यांना लगेच नवीन तबला दिवंगत दत्ता हरिश्चंद्रे यांनी तयार करून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news