.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
उरण : उरण येथील युवती यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी हा पोलिस कोठडीत आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाईल गहाळ झाला होता. आता हा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येणार आहेत. दाऊदने तो आपल्याकडेच लपवून ठेवला होता.
यशश्री हिच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक (गुलबर्गा) येथून अटक केली आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाइलवरून संपर्क होता, अशी कबुली आरोपीने दिली आहे. मोबाइल गहाळ झाला होता. आता हा मोबाईल सापडला आहे. तपासणी व डाटा मिळविण्यासाठी यशश्रीचा मोबाईल लॅबमध्ये पाठविण्यात तपासणी व डाटा मिळविण्यासाठी यशश्रीचा मोबाईल लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. मंगळवारी आरोपीची पोलिस कस्टडी संपणार आहे. आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल मेहुल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
दरम्यान, आरोपीने यापूर्वी यशश्रीने लग्नास नकार दिल्याने आपण तिची हत्या केल्याचे सांगीतले आहे. यशश्रीला घटनास्थळी भेटायला बोलावताना आरोपीने तिचे अश्लिल फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे यशश्री दाउदला भेटायला गेली आणि तिथे दोघांचा वाद होऊन दाऊदने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. आता तिचा मोबाईलच सापडल्याने यामधून अनेक धागेदोरे बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.