

पोलादपूर : पुढारी वृत्तसेवा
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील भौगोलिक अंतर कमी करून विकासाच्या नव्या वाटा खुल्या करण्याची क्षमता असलेल्या पोलादपूर-आंभळी मुवारी मार्गाच्या घोषणेने पोलादपूर तालुक्यात विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगांमुळे आजही दळण-वळणाच्या मर्यादा अनुभवणाऱ्या कोकणाला पश्चिम महाराष्ट्राच्या जवळ आणणारा हा मार्ग प्रत्यक्षात साकारल्यास केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर पर्यटन, शेती, व्यापार आणि स्थानिक रोजगाराच्या दृष्टीने पोलादपूर तालुक्याच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळू शकते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे नुकताच पत्रकारांशी संवाद साधताना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या तीन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गाची घोषणा केली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा चापर करून हे मार्ग विकसित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पोलादपूर येथून वाई तालुक्यातील जांभळी पर्यंत भुयारी मार्ग उभारण्याच्या प्रस्तावामुळे पोलादपूरच्या विकासाचा महत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विकासाची नवी जीवनवाहिनी!
पोलादपूर ते जांभळी खोरे जोड
ण्यासाठी भौगोलिक परिस्थितीनुसार दोन संभाव्य भागांचा विचार होऊ शकतो. पहिला पर्याय म्हणजे पोलादपूर-कापडे-पिताळवाडी-उमरठ या ऐतिहासिक परिसराला जोडून खोपड ढवळे येथून चंद्रगडाच्या पायथ्याजवळून भुयारी मार्ग तयार करणे, तर दुसरा पर्याय म्हणजे देवळे करंजे-लहुलसे परिसरातून जांभळी खोऱ्याला जोडणारा भुयारी मार्ग विकसित करणे, या दोन्ही पर्यायांचे तांत्रिक, भौगोलिक, पर्याव स्णीय आणि आर्थिक सर्वेक्षण करून सर्वाधिक व्यवहार्य मार्ग निश्चित करण्याची आवश्यकता आहे. हा मार्ग प्रत्यक्षात आल्यास पुणे आणि सातारा येथून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी अंतर आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. पुणे-सातारा परिसरातील बाजारपेठांशी पोलादपूरचा संपर्क अधिक सुलभ होऊ शकतो. त्याचबरोबर खेड, दापोली आणि मंडणगड या कोकणातील तालुक्यांनाही पश्चिम महाराष्ट्राशी ओडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.
ऐतिहासिक पर्यटनस्थळांना मिळणार ओळख पोलादपूर तालुका हा निसर्ग सौंदर्याबरी बरच शिवकालीन इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेला प्रदेश आहे. मात्र, अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आजही दुर्गम भागात असल्याने पर्यटकांची अपेक्षित वर्दळ या परिसरात पोहोचत नाही. भुयारी मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी या स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलम होऊ शकते. नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामांचे समाधीस्थळ असलेले उमरठ, सूर्याजी मालुसरे यांचे समाधीस्थळ असलेले साखर, अवळच असलेला ऐतिहासिक कांगोरीगड, इवळे येथील चंद्रगड, देवळे येथील प्राचीन शिलाहारकालीन शिवमंदिर, चाकण येथील श्री कालकाई मंदिर तसेच कापडे बुद्रुक येथील श्री रामवरदायनी मंदिर व शिवकालीन तलाव ही पर्यटनाची महत्त्वाची केंद्रे ठरू शकतात.
बाजारपेठ जवळ येणार: पोलादपूर-आंभळी भुयारी मार्ग अस्तित्वात आल्यास पुणे व सातारा या मोठवा बाजारपेठांपर्यंत शेतीमाल पोहोचवणे अधिक सोयीचे होऊ शकते.
रोजगाराच्या संधी...
या ऐतिहासिक स्थळांना ओडणारे रस्ते, निवासव्यवस्था, स्थानिक मार्गदर्शक, माहिती केंद्रे आणि आवश्यक पर्यटन सुविधा विकसित केल्यास पोलादपूरला स्वतंत्र ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख मिळू शकते. साहसी पर्यटन, गड-किल्ले भ्रमंती, धार्मिक पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.