VIP toll pass scam: खालापूर टोल नाक्यावर व्हीआयपी पासचा घोटाळा, मोठे मासे गळाला लागणार?

खालापूर पोलिसांकडून हंगामी कामगारास अटक,मोठ्या रॅकेटचा संशय
VIP toll pass scam
टोल नाक्यावर व्हीआयपी पासचा घोटाळाpudhari photo
Published on
Updated on

खोपोली ः खालापूर तालुक्यात जणूकाही झटपट पैसा कमविण्याची शर्यतच सुरू आहे की काय अशीच चर्चा सर्वत्र सुरू झाली असून एका पाठोपाठ एक घटना समोर येत असून गोदरेज कंपनी च्या प्रकरणा नंतर आता आय आर बी कंपनी मध्ये सुरक्षारक्षक कंत्राटी स्वरूपात कार्यरत असणार्‍या कामगाराने आय आर बी कंपनीचा फ्री टोल करण्यासाठी आय आर बी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी चा बनावट व्हीआयपी पासेस विक्री केल्याचे समोर आले आहे. ओंकार महाडिक असे या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत

या बाबत आय आर बी कंपनीच्या वतीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. याबाबत जाबजबाबा नंतर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार खालापूर पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता खालापूर न्यायालयाने अधिक तपासासाठी 2 ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत .

सावरोली गावजवळ खालापूर टोल नाका आहे. या ठिकाणी स्थानिक कामगारांना सुरक्षारक्षक म्हणून नोकर्‍या दिल्या आहेत. यात सावरोली गावातील ओंकार रामचंद्र महाडिक हा आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी घराचा उदरनिर्वाह च्या दृष्टीने आय आर बी कंपनीने ठेकेदारी पध्द्तीवर सुरक्षारक्षक म्हणून कामावर रुजू केला होते. ते व्हीआयपी पास अनेक टोल नाक्यावर दाखवून पैसे न देता प्रवास सुरू असल्याचे आय आर बी कंपनीचे अधिकारी जयवंत नारायण देसले यांच्या लक्षात आले.

याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात कंपनीच्या वतीने तक्रार दिली होती .मात्र खालापूर पोलिसांनी दोन वेळा आरोपी चा जबाब नोंदविला. मात्र चौकशी सुरू असताना नव्याने रायगड जिल्हयाचा पदभार स्वीकारणार्‍या रायगड पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी याबाबत माहिती घेऊन तात्काळ खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार यांना आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करून अटक करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार आरोपी ओंकार महाडिक याला 29 जुलै रोजी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करीत गजाआड केले आहे. 30 जुलै रोजी खालापूर न्यायालयात हजर केले असता 2 ऑगस्ट पर्यत पोलीस कास्टडी सुनावली आहे या प्रकरणात अनेकांना बनावट व्ही आय पी पास देऊन त्याचा महाराष्ट्रात अनेक टोल नाक्यावर लाभ घेतल्याने आय आर बी कंपनी ची मोठी फसवणूक झाल्याने यात मोठे मासे गळाला लागणार अशी चर्चा सुरू आहे. आता पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत . दरम्यान,या टोल नाक्यावरुन दररोज हजारो वाहने येजा करतात.आता त्यापैकी कोणत्या वाहनाला हा पास दिला आहे हे शोधावे लागेल.

झटपट श्रीमंतीचा हव्यास नडला

नोकरी करीत असताना या टोल नाक्यावरून येजा करणार्‍या रायगडसह पुणे- मुंबई - ठाणे येथील बड्या वाहनांच्या मालकांशी व तालुक्यातील कार्यकर्ते यासह नेत्यांशी ओंकारशी ओळख वाढल्याने झटपट श्रीमंतीची हवा त्याच्या डोक्यात गेली पैसे कमविण्यासाठी शक्कल लढवत आय आर बी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा टोल फ्री साठी बनावट व्हीआयपी पास तयार करून मोठा आर्थिक व्यवहार करत त्या पासांची अनेकांना विक्रीही केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news