Varandha Ghat | वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद

जिल्हाधिकार्‍यांनी जारी केली अधिसूचना
Varandha Ghat
वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंदpudhari photo

रायगड : वरंधा घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भोरमार्गे महाडला जाणार्‍या वरंधा घाट सर्व वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आली आहे. 30 मे रोजीच हा मार्गावरील वाहतूक सुरू झाली होती. त्यानंतर हा घाट आता 31 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे संभाव्या अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पुण्यातून कोकणात जाणारे अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर अपघात होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून भोर-महाड मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट बंद करण्यत आला आहे. हवामान विभागाकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येत असताना हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मालाची ने-आण करणार्‍या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाड हद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी किमो 60/000 (राजेवाडी) ते किमी 81/600 हा घाटाचा भाग कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने अवजड वाहतूकीसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news