उरण पाणजे, एनआरआय पाणथळ जागा जतन होणार, पर्यावरणप्रेमींंमध्ये आनंद

राज्यातील 564 पाणथळ जागांचे केले सर्वेक्षण
uran-panje-nri-wetland-conservation-environmentalists-joy
पाणजे, एनआरआय कॉम्प्लेक्स, टीएस चाणक्य, लोटस लेक आणि खारघर या जागा महाराष्ट्र सरकारने पाणथळ जागा म्हणून निश्चित केल्या आहेत.
Published on
Updated on

उरण | नवी मुंबई फ्लेमिंगो सिटीमधील पाणजे, एनआरआय कॉम्प्लेक्स, टीएस चाणक्य, लोटस लेक आणि खारघर या पाणथळ जागा महाराष्ट्र सरकारने पाणथळ जागा म्हणून निश्चित केल्या असल्याची माहीती माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झाली असल्यामुळे या जागा विकसकांपासून वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींंमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (सीएनसीएससीएम) संस्थेने राज्यातील एकूण 564 पाणथळ जमिनींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून त्यात रायगड जिल्ह्यातील 18, पालघरमधील 8, ठाणे जिल्ह्यातील 19 व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 11 पाणथळ जागांचा समावेश आहे.

पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (सीएनसीएससीएम) या संस्थेला ला महाराष्ट्र राज्यातील पाणथळ प्रदेशांचा नकाशा तयार करणे आणि सर्वसमावेशक दस्तावेज तयार करण्याचे काम सोपवले आहे.

नवी मुंबईतील वनशक्ती, सागरशक्ती, नॅटकनेक्ट, नवी मुंबई एन्व्हारमेंट प्रिझव्हेंशन सोसायटी, सेव्ह नवी मुंबई एन्व्हारमेंट आणि खारपर वेटलैंड हिल्स आदी संस्था व संघटना नवी मुंबई आणि परिसरातील पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहेत. या सर्व संस्था संघटनांच्या वतीने बी. एन. कुमार यांनी पर्यावरण मंत्रालयाकडून सर्वेक्षणाचा तपशील आणि उरण, नेरुळमधील पाणथळ जागा सीएनसीएससीएम सर्वेक्षणाक समाविष्ट आहेत की नाही याची माहिती मागवली होती. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत या पाणथळ जमिनीचे संवर्धन करण्यासाठी राज्याच्या खारफुटी कक्षाने स्वारस्य दाखवले होते, परंतु सिडकोने ही मूळची मिठागरे आणि शेतजमिनी आहेत, त्यामुळे विकसित करण्यास मोकळ्या आहेत असा दावा केला होता. पाणजे पाणथळ जागा एनएमएसईझेडला लीजवर देण्यात आली आहे. ज्यामध्ये सिडकोचा २६टके हिस्सा आहे. याठिकाणी कोणतेही बांधकाम होत नसले तरी, आंतरभरतीच्या पाण्याचा प्रवाह वारंवार अडवला जात असल्याने ओलसर जमीन कोरडी पडते, असे कुमार यांनी सरकारकडे केलेल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे.

५६४ पाणथळ जमिनींचे सर्वेक्षण

माहितीच्या अधिकारात प्राप्त माहिती नुसार, सीएनसीएससीएमने या वर्षा मार्चपासून आतापर्यंत राज्यातील आठ जिल्ह्यांमधील ५६४ पाणथळ जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण केले असून त्यात रायगड जिल्ह्यातील १८. पालघरमधील ८, ठाणे जिल्ह्यातील १९, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११. नागपूर मधील ७१, भंडारा जिल्ह्यातील ३१. चंद्रपूर जिल्ह्यातील ४६ पाणथळ जागांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news