

उरण : उरण नगरपरिषदेसाठी अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून भाजपाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित केला असून आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. भाजपातर्फे उरण शहर भाजपाचे अध्यक्ष कौशिक शहा यांच्या पत्नी शोभा कौशिक शहा यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुरूवारी 13 नोव्हेंबरला भाजपाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज भरणार आहेत.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात अन्य सर्वपक्षीय आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. आघाडीच्या माध्यमातून भाजपला शह देण्याची योजना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखली असली तरी अद्याप त्यांचा नगराध्यक्ष पदाचा तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार ठरले नाही.
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.2 डिसेंबर रोजी होणाऱ्या उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने मित्र पक्षाना डावलून रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.
भाजविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही ताकदीच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र, 21 सदस्य आणि एक नगराध्यक्षपद अशा 22 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणार असून महाविकास आघाडीतून कोण पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झाले नाही.
उरणमध्ये महाआघाडीला नगराध्यक्षपदासाठी सक्षम महिला उमेदवार सापडलेला नाही. दोन दिवसांत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत चर्चा पूर्ण होईल. यानंतर उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आघाडीकडून सांगण्यात आले आहे.
महायुती म्हणूनच लढणार
उरण नगर परिषदेचे नगराध्यक्षपद व महिलांसाठी राखीव आहे. भाजप निवडणूक लढवण्यावर निवडणूक लढवण्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे पक्षांत कोणण्यातही प्रकारचे हेवेदावे, कुरबुरी, कलह नसत्याच्या दावा भाजपने तालुक्यातील सर्व नेत्यांनी केला आहे. त्याच प्रमाणे ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार असल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्वाही दिली.