

हिवाळा सुरू झाला की दरवर्षी नोहेंबर महिन्याच्या प्रांरभी हजारोंच्या संख्येने उरण परिसरातील पाणथळ जागी येणार्या फ्लेमिंगो पक्षांचे यावर्षी आगमन अत्यंत थिम्यागतीने होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येथे सुमारे तीन हजार फ्लेमिंगो पक्षांचे आगमन झाले होते. त्या तूलनेत यंदा अत्यंत तूरळक प्रमाणात फ्लेमिंगोंचे आगमन झाले असल्याचे दिसून येत असल्याची माहिती उरणमधील पक्षी अभ्यासक निकेतन ठाकूर यांनी दिली आहे.
जेएनपीए बंदराजवळच्या पाणजे , डोंगरी, करंजा, न्हावा या चार प्रमुख पाणथळीच्या जागी दरवषीर्र् हजारोच्या संख्येने हे परदेशी फ्लेमिंगो पक्षी येत असतात. मात्र अर्धा डिसेंबर महिना संपला तरी या ठिकाणी फ्लेमिंगो अद्याप गतवर्षी प्रमाणे आले नसल्यामुळे पक्षीप्रेमीं, पक्षी अभ्यासक,पक्षी छायाचित्रकार यांच्यामध्ये काहीशी निराशा दिसून येत आहे.
उरण जेएनपीए परिसरात दरवर्षी दोन प्रकारचे फ्लेमिंगो अर्थात रोहीत पक्षी येतात. रोहीत (ग्रेटर फ्लेमिंगो) आणि छोटा रोहित (लेसर फ्लेमिंगो) अशा इथे येणार्या या फ्लेमिंगोच्या दोन जाती आहेत. उरण तालुक्यांतील खाडी किनारी व पाणथळीच्या जागेवर हे पक्षी मुक्कामी येतात. मोठ्या रोहित पक्षाचे वजन पाच किलोपर्यंत असते, त्याची उंची 125-145 पंख विस्तार 140-165 सेमी पर्यंत असतो. त्यांचे खाद्य नील-हरित शेवाळ, लहान मृदुकाय प्राणी हे असते.
सैबेरीया, रशिया, युरोपमधून येणारे हे फ्लेमिंगो पक्षी गुजरात-राज्यस्थान सिमेवरील कच्छच्या रणामधून सुमारे पाच हजार किलोमिटरचे अंतर दरवर्षी पार करुन येथे येत असतात. थंडी सूरू झाली की साधारणपणे नोहेंबर महिन्पिासून हे फ्लेमिंगो पक्षी येथे यायला सुरूवात होते. फ्लेमिंगो व्यतिरिक्त शॉवेलर डक, हॅरिअर, लॉकेस, नॉब्रबँन, रॅडिश सेल डक, मार्श हॅरिअर, पेंटेड स्टार्क, स्मूनबील, सँड पायपर, देशी पाणकोंबडे, करकोचे, बगळे, पाणकावळे हे पक्षी देखील येथे मोठ्या प्रमाणात येतात. हिवाळा संपला की मार्च-एप्रिल मध्ये हे पक्षी येथून परतीच्या प्रवासास लागतात. मात्र यावर्षी या पक्षांना येथे आगमन उशिराने होत असल्याने त्यांचा येथील मुक्काम वाढण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.