Uran Crime News: तीन वर्षांच्या चिमुरड्याची सावत्र बापाकडून निर्घृण हत्त्या; पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा केलेला बनाव

हा मुलगा त्यांच्या पत्नीचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा असल्याने, हा नराधम त्याच्यावर राग धरून होता व त्याला सतत मारहाण करत असे.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

उरण: तीन वर्षांच्या सावत्र मुलाचा किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उरण तालुक्यात उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा प्रकार लपवण्यासाठी बालकाचा पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव रचणाऱ्या सावत्र बापाविरुद्ध मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या नराधमाने १४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घरात एकटा असलेल्या ३ वर्षे ५ महिने वयाच्या या बालकावर गंभीर हल्ला केला. हा मुलगा त्यांच्या पत्नीचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा असल्याने, हा नराधम त्याच्यावर राग धरून होता व त्याला सतत मारहाण करत असे.

Crime News
Poladpur Kumbharoshi ST Bus Service: आंबेनळी घाट एसटी सेवा बंदीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ

घटनेच्या दिवशी त्याने चिमुरड्याला हाताच्या ठोशांनी व जमिनीवर किंवा भिंतीवर आपटून गंभीर दुखापत केली, ज्यामध्ये बालकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलगा खेळताना पलंगावरून खाली पडून बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला.

त्याला तातडीने इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण येथे दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, १५ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आणि फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले.

Crime News
Mahad Indo Amines Gas Leak: इंडो अमाईन्स कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे एमपीसीबीचे आदेश

हा मृत्यू अपघाती नसून मारहाणीमुळे झालेला मनुष्यवध असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या अहवालानंतर आणि परिसरातील साक्षीदारांच्या चौकशीनंतर मोरा सागरी पोलीसांनी आरोपी नराधमाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (हत्या) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news