Uran Constituency | उरण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार

Maharashtra Assembly Election 2024 | शेकाप-शिवसेना ठाकरे गट-भाजप यांच्यात काँटे की टक्कर; ३ लाख ४२ हजार १०१ मतदार
Maharashtra Assembly Election 2024
उरण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणारFile Photo
Published on
Updated on
जेएनपीए : विठ्ठल ममताबादे

महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाली असून, अर्ज सुद्धा भरून झाले आहे. यावेळी उरण विधानसभा निवडणुकीत २०१९ प्रमाणे भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व शेतकरी कामगार पक्ष यांच्या तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीतही भाजप, शिव- सेना (उद्धव ठाकरे गट), शेकाप यांच्यात चुरशीच्या चित्र दिसत आहे.

उरण मतदार संघात एकूण तीन लाख ४२ हजार १०१ मतदार आहेत. यामध्ये एक लाख ७१ हजार ५२६ पुरुष तर एक लाख ७० हजार ५६३ महिला मतदारांची तसेच १२ तृतीय पंथीयांची नोंद झाली आहे. त्यानुसार २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत २०२४ च्याविधानसभा निवडणुकीत ७० हजार हुन अधिक मतदारांची नोंद झाली आहे. मागील २०१९ साली झालेल्या निवडणुकीत विजयी अपक्ष, सध्या भाजपचे उमेदवार महेश बालदी यांना ७४ हजार ५४९ तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिव सेनेचे मनोहर भोईर यांना ६८ हजार ८३९ तर शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांना ६१ हजार ६०६ मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर शिवसेनेत विभाजन झाले. मात्र लोकसभा निवडणुकीत शेकाप व शिवसेना (ठाकरे) कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी एकत्र येत उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळवून दिले. विधानसभेच्या निवडणुक संदर्भात ४ नोव्हेंबर २०२३ रोजी अर्ज पाठीमागे घेण्याची तारीख होती. मात्र १६ उमेदवार पैकी २ जणांनी अर्ज पाठीमागे घेतले आहेत त्यामुळे उरण विधानसभा मतदार संघात एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल असल्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

समाजमाध्यमाद्वारे जोरात प्रचार सुरू झाला आहे. तर उरणमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच झाल्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. सध्या उरण विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष, शिव- सेना (उद्धव ठाकरे गट) व भाजप या तीन प्रमुख पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. उरण विधानसभा निवडणुकीत प्रीतम म्हात्रे यांना शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. माजी आमदार मनोहर भोईर शिवसेना ठाकरे गटाकडून, तर महेश बालदी हे भाजपकडून निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीत महिला आणि तरुणांची मते निर्णायक ठरणार आहेत. ते मिळविण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. उरण विधानसभा मतदार संघात एकूण ३५५ मतदान केंद्र असून या मतदार संघसाठी १ हजार ८९३ मनुष्य बळ उपलब्ध करण्यात आले आहे. यावेळी तिरंगी लढतीत काटे की टक्कर होणार आहे. या सर्व घडामोडी मध्ये महिलांची मतेही निर्णायक ठरणार आहेत हे दुर्लक्षुन चालणार नाही.

निवडणूक रिंगणातील उमेदवार

१९० - उरण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात १) मनोहर गजानन भोईर (शिवसेना, उबाठा, चिन्ह मशाल), २) महेश रतनलाल बालदी (भारतीय जनता पार्टी, चिन्ह कमळ), ३) ड. सत्यवान पंढरीनाथ भगत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिन्ह रेल्वे इंजिन), ४) सुनील मारुती गायकवाड (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती), ५) कृष्णा पांडुरंग वाघमारे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, चिन्ह सिंह), ६) प्रीतम जे.एम. म्हात्रे (पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, चिन्ह शिट्टी), ७) महेश गणपत कोळी (लोकराज्य पार्टी, चिन्ह जहाज), ८) कुंदन प्रभाकर घरत (अपक्ष, चिन्ह बॅट), ९) निलम मधुकर कडू (अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट), १०) प्रीतम धनाजी म्हात्रे (अपक्ष, एअर कंडिशनर), ११) प्रीतम बळीराम म्हात्रे (अपक्ष, चिन्ह कपाट), १२) बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष, चिन्ह किटली), १३) मनोहर भोईर (अपक्ष, चिन्ह नरसाळे), १४) श्रीकन्या तेजस डाकी (अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news