

खालापूर | तालुक्यात अनाधिकृत लॉजिंगच्या नावाखाली देहविक्रीची कीड फोफावत असून बांग्लादेशी तरुणींचा देखील वावर असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे तालुक्यातील अनैतिक व्यवसाय तेजीत होत असल्याचे दिसत आहे. या सर्व अनैतिक धंद्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांनी खालापूर आणि पनवेलच्या वेशीवर असलेल्या घोसाळवाडी गावाच्या हद्दीत लॉजवर कारवाई करत दोन बांग्लादेशी तरुणी आणि लॉजचा व्यवस्थापकाला ताब्यात घेतले होते. राजरोसपणे चालणार्या अनैतिक धंदे बाबत गल्लीत चर्चा असताना पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. अशा प्रकारच्या कारवाईत सातत्य नसल्याने खालापूर हद्दीत विणेगाव, कलोते येथील अनाधिकृत लॉजिंग मध्ये देहविक्री धंदा तेजीत आहे. विणेगाव येथे बंगल्याचे रुपांतर लॉजिंगमध्येे करण्यात आले असून अनेक तरुणी दिवसा येथे आणल्या जातात. याठिकाणी परप्रांतीय व्यवस्थापक असून या व्यवसायात खोपोलीतील महिला देखील सहभागी असल्याचे स्थानिक सांगतात. अशीच परिस्थिती ऑर्केस्ट्रा बारची असून याठिकाणी दिवस मावळला कि चारचाकी मध्ये कोंबून तरुणी आणण्यात येतात. अनैतिकतेला पोलीस प्रशासनाने वेळीच आवर घालण्याची होत आहे.
यामध्ये खालापूरात पाच वर्षापेक्षा अधिक काळ नोकरी केलेल्या काही पोलीस कर्मचारी यांचे हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा आहे.
तलुक्यातील लॉजिंग ची तपासणी होणे आवश्यक आहे. याठिकाणी येणा-या तरुणींचा वास्तव्याचा पुरावा तपासणी झाल्यास धक्कादायक सत्य समोर येईल. लवकरच यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात येईल.
- दीपक जगताप, भाजपा खालापूर शहर अध्यक्ष