

कोलाड : विश्वास निकम
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड रेल्वे पुलाखाली असणार्या गोदी नदीवरील पुलावर अनेक दिवसापासून मोठा जीवघेणा खड्डा पडला असुन या खड्ड्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणार्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
या खड्ड्यामुळे काल एक टुव्हीलर स्वार या खड्ड्यात अडकून पडला परंतु पाठीमागून कोणतीही गाडी न आल्यामुळे तो थोडक्यात बचावला.परंतु या खड्ड्यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील मुंबई-कडून कोलाड कडे जाणार्या कोलाड गोदी नदीवरील पुलावर अनेक जीवघेणे खड्डे पडले असुन या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.या जुना असलेला पुलाचे काम अद्याप केले गेले नाही.या पुलाच्या बाजूला असणारे पुलाचे काठडे कोसळले होते.ते नवीन बांधण्यात आले आहेत. परंतु जुना असलेला पुल तसाच आहे.मग हा पुल कठड्यामुळे नवीन झाला असल्याचे दाखविण्यात आला नाही ना? असा सवाल प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील कोलाड परिसरात शाळा, कॉलेज, तसेच पॉलिटेक्निकल कॉलेज असुन या महामार्गांवरून असंख्य विद्यार्थी येजा करीत असतात.तसेच कोलाड परिसरातील असंख्य गावातील नागरिक कोलाड बाजापेठेत जाण्यासाठी याच मार्गांवरून येजा करीत तसेच धाटाव एम.आय.डी.सी कडे कामावर जाणारे कामगार याच मार्गाने येजा करीत असतात.तसेच मुंबई कडून गोवा बाजूकडे जाणारी असंख्य वाहने याच मार्गावरून जात आहेत.
दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या खड्ड्यातील पाणी आटले आहे यामुळे हा खड्डा दिसत आहे परंतु पाऊस पडल्यानंतर हा खड्डा पाण्यानी भरला जातो व हा भला मोठा खड्डा वाहन चालकांच्या लक्षात येत नाही यामुळे या खड्ड्यामुळे मोठा अपघात घडण्याच्या अगोदर संबंधित ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम खाते यांनी लक्ष देऊन या पुलावरील खड्डे त्वरित भरण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम गेली सतरा ते आठरा वर्षांपासून सुरु आहे.परंतु लोकनेत्याकडून फक्त तारीख पे तारीख देण्यात आल्या. परंतु सर्व डेडलाईन ही फेल गेल्या असल्याच्या दिसून आल्या आहेत.आता काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहेत मात्र आंबेवाडी (कोलाड) येथील बाजारपेठेत महामार्गाचे अर्धवट स्थितीत आहे. या बाजारपेठेत असणारा उड्डाण पुल अर्धवट स्थितीत आहे. तर या बाजारपेठेत रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असुन या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होत आहेत.तर अपघाताचा धोका ही वाढला असल्याचे दिसून येत आहेत.यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन या बाजारपेठेतील काम मार्गी लावावे अशी मागणी येथील नागरिकां कडून व्यक्त करण्यात येत आहे.