Ulwe Water Shortage: उलवेत पाणीटंचाईविरोधात रहिवाशांचा हंडा मोर्चा; सिडको प्रशासनावर वाढला दबाव

अनंता टॉवर रहिवाशांचा शिस्तबद्ध आंदोलनात मोठा सहभाग; वर्षभराच्या त्रासानंतर ठोस उपाययोजनांची मागणी
Ulwe Water Shortage
Ulwe Water ShortagePudhari
Published on
Updated on

पनवेल शहर : उलवे परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ अनंता टॉवर रहिवासी संघाच्या वतीने शुक्रवारी शिस्तबद्ध पद्धतीने हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Ulwe Water Shortage
Mumbai Zebra Crossing: मुंबईत पुन्हा झेब्रा क्रॉसिंग; पालिकेचा मोठा निर्णय, रस्ते सुरक्षिततेला चालना

सकाळी १० वाजता अनंता टॉवर येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा उन्नती सोसायटीजवळील सिडको कार्यालयावर धडकला. यावेळी महिला, पुरुष तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी पाण्याच्या समस्येचे प्रतीक म्हणून रिकामे हंडे व बाटल्या हातात घेतल्या होत्या.

Ulwe Water Shortage
Republican Party Election: आसाम, तामिळनाडू, केरळमध्ये रिपब्लिकन पक्ष रिंगणात; बंगाल-पाँडिचेरीत भाजपला पाठिंबा

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून, रोजच्या पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत सिडको प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चादरम्यान शिस्त आणि शांतता राखण्यात आली होती.

Ulwe Water Shortage
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी; राष्ट्रीय पुरुष आयोगाचा आवाज

नागरिकांनी एकजुटीचे दर्शन घडवत आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनामुळे सिडको प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, लवकरच ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news