

जयंत धुळप
रायगड : एकीकडे अमेरिकेने भारतीय मासळीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने निर्माण झालेली चिंता, तर दुसरीकडे ब्रिटनने भारतीय सागरी उत्पादनांसाठी आपले दरवाजे 100 टक्के शुल्कमुक्त करून उघडल्याने भारतीय मत्स्य उद्योगाला एक नवी आणि प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. नुकत्याच झालेल्या भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार करारामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंधांना नव्या उंचीवर नेणारा हा ऐतिहासिक करार नुकताच दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अंतिम करण्यात आला.
स्वाक्षरी : भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा 8 टक्के आहे. या करारामुळे महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांमधील मच्छीमार, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांना थेट फायदा होणार आहे.