उद्धव ठाकरे यांनी घेतली मीनाक्षी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट

उद्धव ठाकरे यांनी घेतली मीनाक्षी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट
Published on
Updated on

रायगड: पुढारी वृत्तसेवा : शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी निधन झाले. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि.१) पेझारी येथे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडीत पाटील, मीनाक्षी पाटील यांचे सुपूत्र शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांच्या कुटंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. Meenakshi Patil

यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत खासदार संजय राऊत, मिलींद नार्वेकर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, प्रशांत मिसाळ, पिंटया ठाकूर, हेमंत पाटील, किशोर जैन, दर्शना पाटील, अविनाश पाटील, चंद्रहास पाटील, नरेश म्हात्रे आदी पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जि.प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अर्थ सभापती चित्रा पाटील, जि.प. माजी सदस्या भावना पाटील, शैला पाटील, नृपाल पाटील, सवाई पाटील, सुमन पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, सुरेश खोत, दीपक पाटील आदी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news