

नेरळ : नेरळमध्ये पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणार्या सराईत दोन घरफोड्यांना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.या चोरांवर 18 गुन्हे दाखल दाखल असून,त्यांच्याकडून 1 लाख 29 हजारांचे सोने ताब्यात घेण्यात आले आहे.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 नोव्हेंबर रोजी नेरळ मधील पियुष अपार्टमेंट येथील राहाणार शिक्षक संतोष हिम्मतराव कोळी यांच्या रू नं. 201 फ्लॅटचा दरवाजाचे लॉक तोडून बेडरूम मधील कपाटातील सोने, आणि रोख रक्कम अशी सुमारे 5 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नमूद गुन्हयाचे आजूबाजूस जाणार्या व येणार्या मार्गावरील असलेले 40 ते 50 सी.सी.टीव्ही फुटेज तपासत व केलेल्या अथक प्रयत्नामध्ये त्यांना यश येवून गुन्हयातील आरोपी हा भिवंडी येथील राहणारा असल्याचे समजले. त्यानी अतिशय कष्टपूर्वक, कौशल्याने तांत्रिक तपास व गोपनिय माहिती काढून आरोपी चोरटा शफिक उर्फ टोपी अब्दुल शेख, घुगटनगर, ता. भिवंडी येथून अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्हयातील काही मुद्देमाल रमेश गोपाल सोनी, डोंबीवली याला विक्री केले असल्याचे समजल्याने त्याला देखील नेरळ पोलीसांनी अटक केली आहे.
आरोपीकडून आतापर्यंत या चोरीमधील 1,29,700/- रूपये किमतीचे 26.200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने नेरळ पोलिसांनी हस्तगत केले आहे.
चौकशी दरम्यान नेरळ पोलीसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीभुमी तपासले असता, आरोपी शफिक उर्फ टीपी अब्दुल शेख याचेविरूध्द यापूर्वी ठाणे रबाळे पोलीस ठाण्यात एकूण 13, मनीदमन पोलीस ठाणे 2, एपीएमसी पोलीस ठाणे 1, कासारवडवली पोलीस ठाणे 1, पालघर पोलीस ठाणे 1 असे एकूण 18 घरफोडी चोरीचे गुन्हे व चोरीचे दागीने खरेदी करणार रमेश गापोल सोनी याचेवर कासारवडवली पोलीस ठाणे 2, पालघर पोलीस ठाणे 1, दिडोंशी पोलीस ठाणे 1, चितलसर पोलीस ठाणे, 1 व वसई पोलीस ठाणे 1 असे एकूण 6 चोरीचे मालमत्ता घेण्याचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आल्याने नेरळसह रायगडात ठिकठिकाणी झालेल्या घरफोड्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.या चोर्यांचा शोध लावण्यासाठी पोलिसांनीही कसून तपास केलेला आहे. पण म्हणावा तसा शोध लागलेला नाही.