

विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन मुंबई, ठाणे, तसेच पुणे येथून शुक्रवार दि.१ मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी व शनिवार रविवार, अशा सलग तीन दिवस सुट्या असल्यामुळे असंख्य पर्यटक तसेच कोकणवाशी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणात निघाले आहेत.
परंतु खांब कोलाड, येथील चौपदरी करणाच्या अपूर्ण कामामुळे वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर पर्यंत लांबच लांब लागल्या असुन यामुळे प्रवाशी वर्गाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.यामुळे हा वाहतूक कोंडीचा तिढा केव्हा सुटणार? असा सवाल प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत असुन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोलाड पोलिसांकडून शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत.
शुक्रवार दि.१ मे पासून शनिवार, रविवार, सुट्टी सलग तीन दिवस असल्यामुळे गर्मीने हैराण झालेले नागरिक शरीराला गारवा मिळण्यासाठी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील समुद्रावर जाण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातुन असंख्य पर्यटक तसेच कोकणवाशी मुंबई-गोवा हायवे वरुन एसटीबस, फोर व्हिलर, रिक्षा, टू व्हीलर, तसेच इतर वाहनांनी कोकणात निघाले आहेत. परंतु मुंबई-गोवा हायवे वरील खांब, कोलाड,येथील अपूर्ण कामामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन वाहतूक कोंडी निर्माण झाली.
मुंबई-गोवा हायवे वरील कोलाड येथे उड्डाण पुलाचे काम सुरु आहे.तसेच पुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे ही काम सुरु आहे.तसेच खांब येथील ब्रिजचे काम सुरु आहे.यामुळे येथील अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.परंतु कोलाड ठाण्याचे सपोनि भारत फारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी,वाहतूक पोलिस,भर उन्हात जागोजागी उभे राहून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करीत आहेत.