

नागोठणे : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेण तालुक्यातील बेणसे येथील तीन मुले गावाजवळील सालडोन या ठिकाणी शेत तलावात शुक्रवारी पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे. घटनेत दोन भावांचा मृत्यू झाल्याने अत्तार कुटुंबावर मोठा आघात झाला असून एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने बेणसे गावात शोककळा पसरली आहे.
बेणसे येथील आशपाक अशरफ अंसारी (वय 17), मिझान जाफिर अक्तार (वय 13), जूहेब जाफीर अक्तार (वय 15) ही तीन मुले गावाजवळील सालडोन या ठिकाणी शेत तलावात पोहायला गेली होती. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाली. त्यांना पुढील उपचारा करता वडखळ येथील संजीवनी हॉस्पिटल या ठिकाणी नेले असता डॉक्टरांनी मिझान जाफिर अक्तार, अशपाक अशरफ अंसारी याला मयत घोषित केले. तसेच जूहेब जाकीर अक्तार याचे शनिवारी 21 जून रोजी निधन झाले आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांच्या अकाली मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी या सर्वांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
दरम्यान, शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने बचावकार्यात मोठे अडथळे आले. या बुडालेल्या तरुणांना काही तरुणांनी बाहेर काढून तात्काळ रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेल्फेअर सेंटरमध्ये आणण्यात आले. येथील डॉक्टर व स्टाफने शर्तीचे प्रयत्न करून प्राथमिक उपचार दिले. आणि पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. या ठिकाणी नेले असता डॉक्टरांनी मिझान जाफिर अत्तार आणि आशपाक अशरफ अंसारी याला रात्री मयत घोषित केले. तसेच जूहेब जाकीर अत्तार याचे शनिवार 21 जून रोजी निधन झाले.
घटनेची खबर मिळताच पेण तहसीलदार तानाजी शेजाळ व नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी स्थानिक तरुणांनी वेगाने मदतकार्य केले. या अपघाताचा पुढील तपास सहा.पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत. दरम्यान,जिल्हा प्रशासनाने धोकादायक ठिकाणी पोहायला जाऊ नये,असे आवाहन वारंवार करुनही अशा दुर्घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.