

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
26 जुलै रोजी खांदेरी येथे मासेमारी बोटीला अपघात झाला. या मच्छीमार बोटीतील तीनजणांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा अपुरी पडत होती. मात्र रोहा येथील रेस्क्यू टीम आणि थर्मल द्रोणचा वापर केला गेला. थर्मल ड्रोनमुळे मानवी डोळ्यांना न दिसणआर्या गोष्टी स्पष्टपणे पाहता येतात. ज्याचा वापर विविध क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणात केला जातो. रायगड जिल्ह्यात पर्यटकांच्या शोध मोहिमांमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे.
खांदेरी येथे दोन दिवसांपूर्वी अपघात झालेल्या मच्छीमार बोटीतील तीन जणांचा शोध घेताना रोहा येथील रेस्क्यू टीम आणि थर्मल द्रोणचा वापर केला गेला. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनार्यावर दोन दिवसांपूर्वी पुण्याहून आलेला युवक समुद्रात बुडाला होता. या युवकाचा मृतदेह शोधून काढण्यासाठी तटरक्षक दलाच्या हॅलिकॅप्टरचा वापर केला गेला, तरीही त्याचा शोध लागला नव्हता. अखेर सह्याद्री रेस्क्यू टीम थर्मल कॅमेरा लावलेल्या ड्रोनचा वापर केला. अखेर त्या मृतदेहाचे ठिकाण समजले, परंतु तिथे जावून मृतदेह बाहेर काढणे खूपच आव्हानात्मक होते.
असाच प्रकार 30 जून रोजी माणगाव तालुक्यातील चन्नाट गावाच्या हद्दीतील एका धबधब्याच्या ठिकाणी घडला होता. मृतदेह शोधण्यापेक्षा तो अवघड वाटेने गावापर्यंत आणण्यात सहभागी बचाव पथकांचा कस लागला. उंच उंच डोंगरातील खडतर पायवाटेवरून मृतदेह बाहेर आणण्यामध्ये अगदी जिकरीचे बनले होते. काही ठिकाणी मृतदेह स्ट्रेचर व बोया रिंगच्या साह्याने नदीमधून बाहेर काढावा लागला, तर काही ठिकाणी अगदी स्ट्रेचरच्या साह्याने मृतदेह ओढत बाहेर काढावा लागला.
यामध्ये पोलीस प्रशासन, शेलार मामा रेस्क्यू टीम तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था सहभागी झाली होती. अशा घटना रायगड जिल्ह्यात वारंवार घडत असून मागील दीड महिन्यात 16 व्यक्तांचा विविध घटनांमध्ये मृत्यू झाला. अशा घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकार्यांनी अशा पर्यटनस्थळांवर निर्बंध घातले आहे, तरीही हौसी पर्यटक नव्या नव्या ठिकाणांचा शोध घेत तेथे मौजमजा लुटण्यासाठी जात असून यामुळे बचाव पथकाचे काम अधिकच वाढत चालले आहे.
थर्मल ड्रोन म्हणजे, अशा प्रकारचा ड्रोनमध्ये थर्मल इमेजिंग कॅमेरा वापरलेला असतो. हा कॅमेरा इन्फ्रारेड किरणाद्वारे वस्तूंचे तापमाण ओळखतो आणि त्याचे थर्मल प्रतिमेत रुपांतर करतो. यामुळे दृष्टीला न दिसणार्या उष्णतेच्या पातळीसह गोष्टी सहज पाहता येतात. थर्मल ड्रोनमुळे मानवी डोळ्यांना न दिसणआर्या गोष्टी स्पष्टपणे पाहता येतात. ज्याचा वापर विविध क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणात केला जातो.
अनेकवेळा दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस लागतात तरीही मृतदेह सापडत नाहीत. त्यानंतर ते मृतदेह कुजण्याच्या स्थितीत असतात. प्रचंढ दुर्गंधी, निसरड्या वाटेने हे मृतदेह बाहेर काढून पंचनामा करावा लागतो. हा संपूर्ण कालावधी जसा नातेवाईकांसाठी तणावाचा असतो, त्याही पेक्षा शोधमोहिम राबवणार्या बचाव पथकाला असतो. प्रत्येक क्षणाची बातमी होत असते आणि अशा स्थितीत मृतदेह शोधण्यात आलेल्या अपयशाचा ताण देखील या पथकातील सदस्यांवर असतो. तहान, भूक विसरुन चावपथकातील सदस्य निसर्गाच्या शक्तीला आव्हान देत काम करीत असतात.
सागर दहींबेकर, अध्यक्ष, सह्याद्री रेस्क्यू टीम