श्रीवर्धनमध्ये मोकाट श्वानांची दहशत

नागरिकांसह दुचाकीस्वारांकडून बंदोबस्त करण्याची मागणी
Dog Attack
श्रीवर्धन तालुक्यात मोकाट श्वानांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी चिंतेची बाब बनला आहे. File Photo
Published on
Updated on
श्रीवर्धन : भारत चोगले

श्रीवर्धन तालुक्यात मोकाट श्वानांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी चिंतेची बाब बनला आहे. रस्त्यावर बसलेले श्वानांचे टोळके, दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या मागे धावून त्यावर भुंकणे, ही परिस्थिती रोजचीच बनली आहे. यापेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे रस्त्यावरून चालत असलेल्या व्यक्तीवर श्वानांनी उडी मारून हल्ला करणे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भय आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून श्वानांचे निर्बिजीकरण आणि शस्त्रक्रिया करण्याच्या मोहिमा नियमितपणे राबविल्या जात नाहीत. परिणामी, श्वानांची संख्या दरवर्षी वाढत आहे. श्रीवर्धनच्या प्रत्येक नाका, चौकात श्वानांचे टोळके ठाण मांडून बसलेले असतात. दुचाकीस्वारांना श्वानांच्या हल्ल्याचा भीतीदायक अनुभव येत आहे, ज्यामुळे ते वाहनांचा वेग वाढवून स्वतःच्या जीवाची जोखीम घेत आहेत. अशा परिस्थितीत, काही दुचाकीस्वार श्वानांच्या आक्रमणामुळे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडण्याची घटना घडली आहे. मात्र, श्रीवर्धन नगरपरिषदने भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी जाहीर निविदा प्रसिद्ध केली असली तरी, कुठलीही प्राणी मित्र संघटना अथवा अ‍ॅनिमल वेल्फेअर एजन्सीने याबाबत सक्रियतेने पुढाकार घेतला नाही, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना निराशा झाली आहे.

गेल्या वर्षभरात श्वानांच्या चाव्यांमुळे साधारणपणे 16 ते 20 नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या वर्षी एक महिलेला श्वानाने अनेक ठिकाणी चावा घेतला होता. सुदैवाने ती उपचारांनंतर बचावली. याच प्रकारच्या घटनांमुळे समोर येणारा धोका वाढत आहे. श्रीवर्धन दांडा येथील एक व्यक्ती अ‍ॅक्टिवा दुचाकीवर जात असताना श्वानाच्या आक्रमणामुळे पडून गंभीर जखमी झाला आहे.

जनआंदोलनाचा इशारा

स्थानिक नागरिकांनी आता नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींना भटक्या श्वानांच्या समस्येवर त्वरित उपाय योजना आखण्याची मागणी केली आहे. श्वानांचे निर्बिजीकरण, शस्त्रक्रिया मोहीम लवकरात लवकर राबवावी, अशी जनआंदोलनाची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news