

खोपोली : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली . या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली झाली आहे. गाडीतील चालकाच्या तत्परतेने प्रवाशी तात्काळ बाहेर पडल्याने मोठी घटना टळली आहे.
एक्स्प्रेसवे वरुन पुण्याकडे कार चालक अनिल अग्रवाल (रा पुणे ) हा घेऊन निघाला होता. तो बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ आला असता कारच्या बोनेट मधून अचानक धूर आल्याचे चालकाच्या तात्काळ लक्षात आल्याने त्याने कार बाजूला घेऊन रस्त्याच्या कडेला थांबवली व चालकाने प्रवासी बाहेर काढले आणि लगेच अचानक कारने पेट घेतला, आयआरबी यंत्रणा अपघातग्रस्त ठिकाणी पोचण्यापूर्वीच कार पूर्णपणे जळून खाक झाली होती, या आगीत कोणतीही जीवितहानी घडली नसून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे, ती कार क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आला.