Marine Highway | सागरी महामार्ग तीन वर्षात पूर्ण होणार

खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास
Marine Highway
सागरी महामार्गाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.Pudhari
Published on
Updated on

रायगड | कोकणच्या विकासात महत्वपूर्ण ठरणार्‍या सागरी महामार्गावरील आठ पूलांच्या कामाकरिता निधी मंजूर झालेला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्यात बरोबर महामार्गाच्या कामाल गती देण्यात येईल. परिणामी सागरी महामार्गाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर व माणगांव बायपासचे काम रखडले होते. तेथील भूमीसंपादनाची समस्या दुर झाली आहे. त्यामुळे या दोन्ही बायपासच्या कामांना आता वेग येईल. हे दोन्ही बायपास मार्ग सुरु झाल्यावर सध्या इंदापूर व माणगांव मधील वाहतूक कोंडीची समस्या पूर्णपणे संपेल व प्रवास वेगवान होईल.येथील सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन, हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपूरावा करणार असल्याचेही खा.तटकरे यांनी सांगीतले.

याच मार्गाला जोडून पुढे कोकणच्या ग्रिनफिल्ड सागरी महामार्गाची रचना करण्यात आली आहे. यामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होवू शकणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाच मोठी सागरी पुले बांधावी लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झालेले आहे. दुसरे पूल आहे, आगरदांडा-दिवेआगर तर तिसरे पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथेपूल आहे दाभोळ-जयगड या सर्व पूलांना ग्रिनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजूरी देण्यात आली आहे. मात्र हा महामार्ग होण्यास आणखीन चार ते पाच वर्षे लागणार आहेत. किनारपट्टी सागरी महामार्गाची नवी रचना होत असताना दुसर्‍या बाजुला आजच्या डिजिटल युगामध्ये नवतंत्रज्ञानाद्वारे सागरी किनारपट्टी विकास हाती घेण्यात आला आहे. देशातील 12 बंदरे आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकसीत होत आहेत.

या 12 विकसीत होणार्‍या बंदरांमध्ये पालघरचे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसीत होईल. हे बंदर जेएनपीटीच्या बरोबरीचे विकसीत होणारे बंदर ठरेल. यामुळे जलवाहतूकीला मोठा वाव मिळणार आहे. याशिवाय पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील 48 छोटी बंदरे विकसीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदरांजवळील 12 शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारचे औद्योगिक प्रकल्प, महामार्ग प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र यांच्याशी सागरमालातील विविध प्रकल्पांचा समन्वय साधला जाणार असल्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news