रायगड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यांतील पनवेलमधील तीन केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 398 विद्यार्थी आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यांतील तीन केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या आयोजनासाठी 24 ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या समितीच्या सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी परीक्षेची बैठक व्यवस्था पोलिस बंदोबस्त, कस्टडी रुम (प्रश्न पत्रिका, उत्तर पत्रिका व स्वाक्षरीपट ठेवण्यासाठी) जिल्हा नियंत्रण कक्ष, परीक्षा केंद्र, अधिकारी, कर्मचारी नेमणुका, वाहन व्यवस्था, व्हिडीओ चित्रीकरण व भरारी पथक यांना याबाबत माहिती दिली.
ही परीक्षा ही पनवेल शहरातील के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, सेक्टर 18, सिडको कॉलनी, नवीन पनवेल येथे सकाळ सत्र सकाळी साडेदहा ते दुपारी एक या कालावधीत पेपर-1साठी 682 परीक्षार्थी व दुपार सत्र दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या कालावधीत पेपर-2 साठी 682 परिक्षार्थी, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माध्यमिक, सेक्टर 1 ई, सिडको कॉलनी, कळंबोली मॅकडोनाल्डच्या पाठीमागे, पनवेल येथे सकाळ सत्र सकाळी साडे दहा ते दुपारी एक या कालावधीत पेपर 1 साठी 760 परीक्षार्थी व दुपार सत्र दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या कालावधीत पेपर -2 साठी 865 परीक्षार्थी, चांगु काना ठाकूर विद्यालय, जनार्दन भगत मार्ग प्लॉट न. 8 सेक्टर- 14, सिडको कॉलनी, नवीन पनवेल येथे दुपार सत्र दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या कालावधीत पेपर- 2 साठी 409 परीक्षार्थी असे एकूण 3 हजार 398 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
या परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक व योजना) व शिक्षणाधिकारी, पनवेल महानगर पालिका पनवेल यांची भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, असे पुनिता गुरव, सदस्य सचिव, जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, यांनी कळविले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यांतील तीन केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 398 विद्यार्थी आहेत. या परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक व योजना) व शिक्षणाधिकारी, पनवेल महानगर पालिका पनवेल यांची भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
- पुनिता गुरव, सदस्य सचिव, जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रायगड जिल्हा परिषद