घासून नाही तर ठासून निवडून आलो : खासदार तटकरे

खासदार सुनिल तटकरे यांची विरोधकांवर टोळेबाजी
MP Sunil Tatkare said in the meeting at Mhasla
म्हसळा येथील आयोजित सभेत खासदार सुनिल तटकरे बोलत होते. Pudhari News Network

म्हसळा : नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत लाखों मतांच्या फरकाने निवडून येऊ म्हणणारे आता पुन्हा गायब झाले आहेत. ते दिसत नाहीत, असा सणसणीत टोला शुक्रवारी (दि.२१) खासदार सुनिल तटकरे यांनी महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अनंत गिते यांना लगावला. तसेच मी घासून नाही तर ठासून निवडून आलो, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युतीचे मित्र पक्षाने आयोजित सभेत ते बोलत होते.

Summary
  • म्हसळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या सभेत सुनिल तटकरे बोलत होते.

  • खासदार तटकरे यांनी शिवसेना नेते अनंत गिते, शेकाप नेते जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

  • ८२,७८४ मतांची आघाडी घेऊन निवडून आल्याबद्दल खासदार तटकरे यांनी समाधान व्यक्त केले.

शेकापच्या नेत्यांनी मतदारांना गृहीत धरून मतांचे आणि बेरजेचे राजकारण करत सातत्याने भूमिका बदलल्याने त्यांच्यावर ही वेळ आली, असे सांगत तटकरे यानी शेकाप नेते जयंत पाटील यांचाही खरपुस समाचार घेतला. तसेच दिल्लीत आमच ठरलयं आगामी विधानसभा निवडणुकीत रायगडमधील महायुतीचे सर्वच उमेदवार शंभर टक्के निवडून आणणार असल्याचीही ग्वाही तटकरे यांनी यावेळी दिली.

MP Sunil Tatkare said in the meeting at Mhasla
असंही एक मंदिर जे वर्षातून फक्त 2 महिनेच दिसतं! पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर

युतीच्या सरकारमध्ये सत्तेत असलो तरी, आम्ही आमचा धर्मनिरपेक्षपणा सोडला नाही. लोकसभा निवडणुकीत आघाडी पक्षांतील विरोधकांनी खोटे बोलुन जनतेची दिशाभूल केली. त्याचा परिणाम मतदानावर झाला आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजाची घटलेल्या मतांची टक्केवारी पाहता खासदार तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

MP Sunil Tatkare said in the meeting at Mhasla
J P Nadda : जे. पी. नड्डा यांना मिळणार राज्यसभेचे पक्षनेतेपद

सन २०१९ ते २०२४ मध्ये खासदार म्हणून मी विरोधी पक्षात होतो. आता मी सरकार पक्षाचा खासदार आहे. सत्तेत असल्याने मागच्या पेक्षा अधिक गतीने विकास कामांसाठी निधीची उपलब्धता करेल, अशी ग्वाही देताना गाववाडी वस्तीत मंजूर करण्यात आलेली विकास कामे दर्जेदार करावीत, अशा सूचना करताना तक्रार झाल्यास सबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर खासदार तटकरे यांनी ३२ रायगड लोकसभा मतदार संघातील युतीच्या सर्वच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करत ८२,७८४ मतांची आघाडी घेऊन निवडून आणल्याचे समाधान व्यक्त करताना सर्वांचे जाहीर आभार मानले.

MP Sunil Tatkare said in the meeting at Mhasla
LokSabha Elections 2024 | जे काम हाती घेते ते पूर्णच करते : सुनेत्रा पवार

यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, भाजपचे नेते छोटमभाई उर्फ दिलीप भोईर ,तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती महादेव पाटील, नाझिम हसवारे, माजी जिल्हा सभापती बबन मनवे, डॉ.मुस्ताक मुकादम, उपनगरध्यक्ष संजय दिवेकर, सुनिल शेडगे, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, अंकुश खड्स, शाहिद उकये, भाई बोरकर, लक्ष्मण भाये, भाई दफेदार, फैसल गीते,रियाज घराडे, यांच्यासह युतीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news