ZP School News : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेशाची रक्कम

शासनाकडून दोन कोटी 15 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
Raigad ZP School News
ZP School News : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेशाची रक्कम(Pudhari File Photo)
Published on
Updated on

Students of Zilla Parishad schools will receive the uniform allowance

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

रायगड जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या 89 हजार 728 विद्यार्थ्यांना नियमीत गणवेशाची रक्कम लवकरच मिळणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्याचे नियोजन केले असून शासनाकडून दोन कोटी 15 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तालुका स्तरावर हा निधी वितरीत करण्याचे काम सुरु केले असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

Raigad ZP School News
Nanded News : निकालात घट; मुलांपेक्षा मुलीच पुढे

15 जून नंतर शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वेळेवर मिळावे, तसेच शाळेच्या पहिल्या दिवसापासून गणवेश उपलब्ध व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद शाळा सुरु होण्यासाठी वीसहून अधिक दिवस शिल्लक राहिले आहेत.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नियमीत गणवेश देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग कामाला लागले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन हजार 473 शाळा आहेत. या शाळांमध्ये 98 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Raigad ZP School News
Parbhani ZP school uniform scheme : 67 हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत गणवेशासह बूट, सॉक्स

मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या घटकातील मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शाळेबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले, सर्वसाधारण इतर मागासवर्ग घटकातील मुले अशा एकूण 89 हजार 728 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार आहेत.

Raigad ZP School News
Jalna News : बारावीचा जिल्ह्यात निकाल ८६.१७ टक्के

त्यासाठी दोन कोटी 15 लाख रुपयांचा निधीही शासनाकडून प्राप्त झाला आहे. तालुका स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीला हा निधी वर्ग केला जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम मिळणार आहे. मात्र यावर्षी फक्त 240 रुपयेच एका गणवेशामागे रक्कम दिली जाणार आहे. शासनाकडून फक्त 80 टक्के निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे तिनशे रुपयांच्या जागी 240 रुपये प्रमाणे निधी वितरीत केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news