

ST bus crash Mahad Vinhere road
महाड : महाड-विन्हेरे मार्गावर एस.टी. बसला आज (दि.२३) भीषण अपघात झाला. मांडवकर कोंड गावाच्या हद्दीत बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट झाडावर आदळली. या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 10 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्याहून फौजी आंबावडे गावाकडे ही बस निघालेली होती. अपघातानंतर सर्व जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.