रोहा यार्ड येथील अप रोडवरील ओव्हरराइडिंग स्‍विच पॉइंट बदलण्यासाठी ११ फेब्रुवारीला विशेष ब्‍लॉक

सकाळी ११ : १५ ते दुपारी ३ : ४५ पर्यंत ब्‍लॉक घेण्यात येणार
Special block on February 11th to replace the overriding switch point on Roha Up Road
रोहा यार्ड येथील अप रोडवरील ओव्हरराइडिंग स्‍विच पॉइंट बदलण्यासाठी ११ फेब्रुवारीला विशेष ब्‍लॉकFile Photo
Published on
Updated on

रोहे : पुढारी वृत्तसेवा

मध्य रेल्वे दि. ११.०२.२०२५ रोजी रोहा यार्डमधील अप रोडवरील पॉइंट क्रमांक १२६ ब आणि १२७ ए च्या ओव्हरराइडिंग स्विच बदलण्यासाठी ब्लॉक परिचालीत करणार आहे. रोहा येथे अप आणि डाउन मुख्य मार्गांवर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस प्रवास दि. ११.०२.२०२५ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 16346 तिरुवनंतपुरम- लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस दि. १०.०२.२०२५ रोजी सुटणारी. गाडी क्रमांक 12617 एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस दि. १०.०२.२०२५ रोजी सुटणारी. गाडी क्रमांक 19577 तिरुनेलवेली - जामनगर एक्सप्रेस दि. १०.०२.२०२५ रोजी सुटणारी. या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने चालतील.

प्रवाशांच्या फायद्यासाठी 16346 तिरुवनंतपुरम - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेसला रोहा स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाईल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news