Sonchafa Flower Business: कोकणात सोनचाफ्याची मोठी उलाढाल; धार्मिक कार्य आणि अत्तर उद्योगातून व्यवसायवृद्धी

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून दररोज लाखो रुपयांच्या सोनचाफ्याची आवक-जावक होत असून, स्थानिक बाजारपेठेसह मुंबई-पुण्याच्या बाजारात या फुलाला मोठी मागणी आहे.
Sonchafa Flower Business
Sonchafa Flower BusinessPudhari
Published on
Updated on

रायगड: "चाफा बोलेना, चाफा चालेना..." या ओळींतून मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणारा सोनचाफा आता केवळ गाण्यापुरता मर्यादित राहिला नसून, कोकणातील शेतकऱ्यांसाठी आणि फुलविक्रेत्यांसाठी मोठ्या आर्थिक उलाढालीचे साधन बनला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून दररोज लाखो रुपयांच्या सोनचाफ्याची आवक-जावक होत असून, स्थानिक बाजारपेठेसह मुंबई-पुण्याच्या बाजारात या फुलाला मोठी मागणी आहे.

Sonchafa Flower Business
Shravani Thale: स्वप्न अंतराळाचं,ध्येय इस्त्रोचं! श्रावणीच्या स्वप्नांना नवी दिशा

कोकणातून दररोज मुंबईतील दादर, कल्याण आणि पुण्याच्या फुल बाजारात हजारो शेकडा (प्रति १०० फुले) सोनचाफा पाठवला जातो. सण-उत्सव, लग्नसराई आणि श्रावण महिन्यात या फुलांची विक्री गगनाला भिडते.

नेहमीच्या दिवसांत एका फुलाला ३ ते ५ रुपये मिळतात, तर श्रावण, गणेशोत्सव आणि नवरात्रीत एका फुलाचा दर ८ ते १५ रुपयांपर्यंत पोहोचतो. एका पूर्ण वाढलेल्या झाडापासून दररोज ५० ते २०० फुले मिळतात.

एकट्या रायगड जिल्ह्यातून स्थानिक विक्रेते आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून महिन्याला सुमारे ५लाख रुपयांची उलाढाल होते.

Sonchafa Flower Business
Kashid Beach Swimming Ban: काशिद समुद्र किनारी शुकशुकाट; पावसाळ्यात पर्यटकांना समुद्रात पोहण्यास बंदी

अत्तर व कॉस्मॅटिक्स उद्योग

सोनचाफ्याचा तीव्र आणि टिकाऊ सुगंध अत्तर निर्मिती (Perfume Industry) तसेच सुगंधी तेले आणि कॉस्मॅटिक्स तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

या उद्योगांकडून फुलांना थेट बागांमधून मोठी मागणी असते. मंदिर संस्थाने, धार्मिक विधी, तसेच महिलांच्या वेणी-गजऱ्यासाठी सोनचाफा वर्षभर विकला जातो. सोनचाफ्याचे झाड एकदा लावले की ते अनेक वर्षे उत्पादन देते. इतर पिकांच्या तुलनेत याला कीड लागण्याचे प्रमाण कमी असते आणि देखभाल खर्चही अल्प असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news