

महाड : स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे महाड मतदार संघातील असणारे विकासात्मक सामाजिक बांधिलकीचे स्वप्न स्नेहल जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज महाडमध्ये केला. मी शब्दाचा पक्का असून कोकणात राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी नव्या जुन्यांची मोट बांधून स्नेहलच्या पाठीशी राजकीय ताकद उभी करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
आपल्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष हा संविधान व कायद्याला मानणारा असून पक्ष जातीभेद वर्णभेद मानणारा नसल्याचे मत व्यक्त केले. आज भर पावसामध्ये या कार्यक्रमासाठी आलेल्या हजारो राष्ट्रवादी प्रेमींची संख्या पाहता स्नेहल जगताप यांनी घेतलेला निर्णय हा महाडकरांना आवडला असल्याचे दिसून येत असून त्याबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. नेतृत्वाचे गुण असणाऱ्यांना जातीपातीचा विचार न करता पक्ष सर्व ताकद पाठीशी उभी करेल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी पितृछत्र हरपल्यानंतरही 24 तासात महाडकरांच्या सेवेत राहणाऱ्या स्नेहल जगताप यांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. लोकसभा मतदारसंघातील 60 हजाराचा हिशोब संबंधितांना द्यावा लागेल असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना स्नेहल जगताप यांनी महाड मतदार संघाचा कायापालट करण्याची गरज असल्याचे नमूद करून एमआयडीसी मध्ये कायद्याचे राज्य व्हावे अशी मागणी केली. महाडची भूमी ही क्रांतीची संस्कृतीची सांस्कृतिक व राजकीय तिची असताना स्नेहल जगताप यांनी केलेला प्रवेश हा नव्या क्रांतीची सुरुवात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. व त्यासाठी उद्या नवी ताकद निर्माण होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. स्नेहल जगताप यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात केलेल्या विविध कार्यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. येथील स्थानिक कामगारांना योग्य पद्धतीने सन्मानपूर्वक वागणूक द्यावी व कंत्राटी पद्धत रद्द करावी अशी मागणी स्नेहल जगताप यांनी केली.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, आमदार शेखर निकम, रायगड जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष सुभाष केकाने, मधुकर सावंत, स्नेहल जगताप , हनुमान जगताप ,सुभाष शेठ निकम, चंद्रकांत बुवा जाधव, निलेश महाडिक ,राकेश शहा, गजानन अधिकारी, अपेक्षा कारेकर, सायली दळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.