

महाड : वीज कायदा 2003 च्या कलम 55 नुसार. स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नसले तरी महाड शहर व तालुक्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे काम चालू आहे त्याला नागरिकांनी विरोध चालू केला आहे. असे असताना देखील महाड शहरात बेकायदेशीरपणे घरात घुसून वीज मंडळाचे व एजन्सी धारकांचे नियुक्त केलेले प्रतिनिधी जाणेपूर्वक वीज मीटर लावत असल्याने नागरिकांकडून तीव्र क्षमता याबाबत व्यक्त केला जात असून बेकायदेशीरपणे वीज मीटर बसवण्याची मोहीम तातडीने थांबवा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा वीज महामंडळाला मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी दिला आहे.
महावितरणचे. महाड येथील उपकार्यकारी अभियंता सतीश गद्री म्हणाले की स्मार्ट वीज मीटर हे महावितरणचे असून अदानी केवळ एजन्सी असून केवळ सध्या फॉल्टीमीटर बदलण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असताना देखील 7 ऑगस्ट रोजी महाड . शहरातील अनेक भागातील घरांमध्ये कोणी नसल्याचे पाहून हाताने कंपनीचे प्रतिनिधी व विद्युत महामंडळाचे कर्मचारी स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे शक्ती करत असल्याने नागरिक तीव्र संतप्त झाले आहेत अनेकांनी वीज मंडळाच्या कर्मचार्यांना याबाबत जाब विचारला तेव्हा हे कर्मचारी पळून गेले व आम्ही दुसर्या घरात बसवणार होतो चुकून तुमच्या घरात बसवले अशी वक्तव्य करून त्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न विज मंडळाच्या कर्मचार्यांनी केल्याचे उघड झाले आहे.
त्यातच महाड तालुक्यातील शिरसवणे ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र धोत्रे यांनी शिरसवणे ग्रामपंचायतचा एकमुखी ठराव घेऊन शिरसवणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्मार्ट विज मीटर बसवण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याचे लेखी निवेदन सादर केले या पार्श्वभूमीवर महावितरण चे महाड येथील उपकार्यकारी अभियंता सतीश गदरी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम महाड तालुक्यात चालू असले तरी सुरुवातीला फॉल्टीमीटर बदलण्याचे काम चालू असल्याचे सांगितले
वीज कायदा 2023 च्या कलम 55 नुसार. स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही असे असले तरी आदानी समूहाकडून शहरी व ग्रामीण भागात घरात कोण नसल्याचे पाहून अथवा वृद्ध व्यक्ती असल्याचे फायदा घेऊन मीटर तपासणीसाठी आल्याचे सांगून जुने फॉल्टी नसलेली मीटर काढून स्मार्ट वीजमीटर लावले जात आहेत हे मीटर वेगाने फिरत असल्याने वीज ग्राहकांना त्याचा नाहक भुर्दंड पडत असल्याने या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलने व विद्युत महामंडळाच्या कार्यालयात घेराव घालण्याचे तसेच निवेदनाद्वारे इशारा देण्याचे काम महाड शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चालू झाले आहे.
महाडच्या महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सतीश गदरी याबाबत बोलताना म्हणाले की सुरुवातीला फॉल्टीमीटर बसवण्याचे काम चालू आहे असे सांगितले असताना देखील वीज मंडळाचे कर्मचारी व आदानेचे प्रतिनिधी हे जाणीवपूर्वक नागरिकांना दमदाटी करून त्यांचे जुने चालू अवस्थेतील योग्य मीटर काढून त्या जागी स्मार्ट मीटर बसवत असल्याने महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी विद्युत मंडळाच्या आणि अदानी कंपनीच्या कर्मचार्यांना बेकायदेशीरपणे स्मार्ट मीटर बसवाल तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
विरोधानंतरही कार्यवाही सुरूच
महाड तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट वीज मीटर बदलण्याचे काम महावितरण कडून चालू आहे याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी विरोध केला त्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विरोध चालू झाला आहे