Mahad News : महाडमध्ये सावित्री नदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ!

२० कोटी रूपयांची शासनाकडून मंजुरी : मंत्री भरत गोगावले
Mahad News
Mahad News : महाडमध्ये सावित्री नदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ!File Photo
Published on
Updated on

महाड : पुढारी वृत्तसेवा

महाडच्या सावित्री नदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा एकदा परवानगी मिळाली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. महाडमध्ये पुर येऊ नये यासाठी नदीतील गाळ उपसण्याचे हे काम केले जात आहे. पावसाळा तोंडावर आला असून पाच ते सहा ठिकाणी पुर्ण क्षमतेने गाळ उपसण्याचे काम केले जाणार आहे. या करता 20 कोटी रूपये मंजूर झाले असल्याची माहिती गोगावले यांनी दिली आहे.

Mahad News
Waqf Amendment Act case| 'वक्फ'वरील सुनावणीवेळी 'खजुराहो'चा उल्लेख! सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्‍हणाले?

जून 2021 मध्ये आलेल्या महाप्रलयानंतर स्थानिक नागरिकांच्या असलेल्या गेल्या दहा ते बारा वर्षांच्या नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत समस्ये कडे शासनाने प्राधान्याने लक्ष देऊन 22 व 23 या वर्षी नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला.

Mahad News
Cabinet Decisions | राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

याचा दृश्य लाभ महाडकर नागरिकांना 23 व 24 यावर्षी महापुरापासून पूर्णपणे फायदा झाल्याचे दिसून आले. मात्र मागील वर्षी व चालू वर्षी आतापर्यंत नदीपात्रातील गाळ काढण्यासंदर्भात शासकीय निर्णय प्रतीक्षेत होता. या संदर्भात मंत्री भरतशेठ गोगावले यांनी शासन दरबारी महाडकरांची असलेली ही ज्वलंत समस्या स्पष्ट करून पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामी मंजुरी मिळावी अशी आग्रही मागणी केली होती. ती शासनाने मंजूर केली असून त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्याची माहिती मंत्री गोगावले यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

Mahad News
'बिगबँग थिअरी' मागचा गुरू... राज ठाकरे यांनी नारळीकरांच्या कार्याला दिला उजाळा !

यामुळे नागरिकांची असलेली मागणीची पूर्तता झाली आहे. आगामी वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर या गाळ काढण्याच्या मोहिमेचा लाभ महाडकरांना होणार आहे.

मंत्री भरत शेठ गोगावले यांनी यासंदर्भात महाड पूर निवारण समिती व स्थानिक नागरिकांकडून आलेल्या पाठपुराव्याची दखल गंभीरपणे घेऊन त्यावर मार्ग काढला. त्‍या बद्दल महाड पूर निवारण समिती व स्थानिक नागरिकांकडून मंत्री भरत शेठ गोगावले यांना धन्यवाद देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news