

नवीन पनवेलमधील एका शाळेतील विद्यार्थीनी अभ्यास करत नाही म्हणून, पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या या अवघ्या पाच ते सहा वर्ष वयाच्या विद्यार्थीनीला शिक्षा म्हणून तीच्या शिक्षीकेने शाळेतील एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्याच्या अत्यंत अमानवी शिक्षेचा अवलंब केला. अशा प्रकारे एकूण पाच विद्यार्थीनींना ही शिक्षा केल्याचा प्रकार उघड झाला आहे. शिक्षिकेच्या या वर्तनामुळे संतप्त होऊन आक्रमक झालेल्या पालकांनी आज हिंदवी सेनेच्या नेतृत्वाखाली शाळे विरोधात आंदोलन करत, शाळा प्रशासनास या गैरप्रकारचा जाब विचारत शाळा प्रशासनाला धारेवर धरले आणि शिक्षा देणाऱ्या संबंधीत शिक्षिके विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
नवी पनवेल महानगरपालिका हद्दीतील विल्फ्रेड किड स्कुल या शाळेत हा अत्यंत संतापजनक आणि बालमनावर विपरित परिणाम करु शकणारा अशा प्रकार घडला आहे. शाळेतील विद्यार्थी अभ्यास करत नाही तसेच शाळेत घेतलेल्या परीक्षेत त्यांना कमी मार्क मिळाले म्हणून विद्यार्थीनींना शाळेतील अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्याचा प्रकार पालकांच्या तक्रारी नंतर समोर आला आहे. या प्रकारची माहिती त्रस्त पालकांनी पनवेल मधील हिंदवी सेनेला दिली.
हिंदवी सेनेकडे ही तक्रार केल्या नंतर सोमवारी हिंदवी सेनेचे पदाधिकारी निलेश पाटील, संजय मुरकुटे, प्रभाकर बहिरा, गिरीश बव्हाण तसेच महिला पदाधिकारी शिल्पा पवार, मिनल पाटील, अश्विनी मुरबडकर आणि पाच ते सात पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत शाळेला घेराव घातला. शाळेत पाडत असलेल्या गैरप्रकाराया जाय शाळा प्रशासनाला विचारला, शाळेने दिलेल्या गंभीर शिक्षे मुळे आमच्या मुलाच्या मनात शाले बाबत भीती निर्माण झाली आहे. तसेच आमची मुले आजारी पडली आहेत, असा तक्रारींचा पाढाच या वेळी त्रस्त पालकांनी शाळा प्रशासना समोर वाचला.
हिंदवी सेनेच्या पदाधिकारी निलेश पाटील, संजय मुरकुटे, प्रभाकर बहिरा, गिरीश चव्हाण, तसेच महिला पदाधिकारी शिल्पा पवार, मिनल पाटील, अश्विनी मुरबडकर आणि पाच ते सात पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत शाळेत घेराव घातला. संबंधीत शिक्षीकेवर कारवाई करण्याचे आश्वासन साय प्रशासनाच्या वतीने दिल्यानंतर आक्रमक झालेल्या पालकांनी आंदोलन मागे घेतले.
माझी मुलगी याच शाळेत शिकते मात्र मार्क कमी पडले, अभ्यास कमी करते माणून माझ्या मुलीला शाळेतील एका अंधाच्या बंद खोलीत डांबून ठेवले होते. त्यामुळे माझी मुलगी शाळेत जाण्यास घाबरत आहे. एवढी मोठी आणि भयावह शिक्षा मुलांना शाळेच्या शिक्षिकेने देऊ नये. - पालक
शाळेतील शिक्षा झालेल्या विद्यार्थीनींच्या पालकांकडून आम्हाला लेखी तक्रारी आल्या नंतर आज शाळेच्या विरोधात आंदोलन करुन संबंधीत शिक्षीकेवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. येत्या चार दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल.
-निलेश पाटील, हिंदवी सेना