Raigad News : 'शिवाजी महाराज सर्किट' विशेष रेल्वे आज माणगावमध्ये दाखल होणार
'Shivaji Maharaj Circuit' special train will arrive in Mangaon today
रायगड : पुढारी वृत्तसेवा
भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत सोमवार (९ जून २०२५ पासून सुरू होत असून पहिल्या दिवशी रायगड किल्ला येथे भेट देणार आहेत.
या ५ दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. ही विशेष रेल्वेचे उद्या सकाळी १०.३० वा माणगाव रेल्वे स्थानक येथे आगमन होणार आह. सायंकाळी ५ वा रेल्वेने पुणे कडे प्रयाण करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
शुभारंभ दिनांक : ९ जून २०२५, कालावधीः ५ दिवस / ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती), प्रारंभ व समाप्ती स्थानः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक दादर, ठाणे यात्रेचा प्रवासमार्ग -मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा मुंबई.
प्रमुख स्थळांची माहिती: रायगड किल्ला, लाल महाल, पुणे कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय., शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड किल्ला कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

