Konkan MLC seat dispute: कोकणात महायुती आमनेसामने येणार; अनिकेत तटकरेंच्या जागेवर राजन साळवींना शिवसेना उभे करणार

राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या कोकण मतदार संघावरही शिसेनेने दावा केला आहे.
Konkan MLC seat dispute
Konkan MLC seat disputePudhari
Published on
Updated on

रायगड: ज्या पक्षाचा 2022 ला आमदार होता त्याच पक्षाला ती जागा देण्याचा फॉर्म्यूला महायुतीत ठरला असला तरी अनिकेत तटकरे यांच्या जागी राजन साळवींना उभे करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने कोकण मतदार सघांत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी लढत होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरझालेल्या बैठकीत एकूण 17 जागांपैकी शिवसनेला 3 ,राष्ट्रवादीला 2 तर भाजपाला 12 जागा देण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या कोकण मतदार संघावरही शिसेनेने दावा केला आहे.

Konkan MLC seat dispute
Free Textbook Distribution: समग्र अभियानांतर्गत २ लाख २५६ विद्यार्थांना पुरविणार मोफत पाठ्यपुस्तके

ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले राजन साळवी यांना शिवसेना उमेदवारी देणार आहे. जागा वाटपात ठाण्याची जागा शिवसेनकडे असून त्या जागेवर रविंद्र फाटक यांची उमेदवारी निश्चित आहे.

तर इतर जागांपैकी मराठवाडा आणि उत्त्तर महाराष्ट्रात शिवसेनेला एकएक जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला पश्चिम महाराट्र व दक्षिण कोकणची जागा मिळणार आहे.

Konkan MLC seat dispute
Bride missing case: लग्नाचा हॉल बुक...हळदीची तयारी फुल्ल; पण नवरीच कुटुंबीयांसह ‘मिसिंग‌’!

सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगांव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक , वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छ.संभाजीनगर, जालना, नागपूर अशा 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. या मध्ये नागपूर, अमरावती, धाराशिव, वर्धा, भंडारा, गोंदीया, पुणे, यवतमाळ, नांदेड, सोलापूर येथे भाजपाचे उमेदवार असू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news