Shiv Rajyabhishek Sohala Raigad | सुवर्णक्षणांचा साक्षीदार रायगड! सह्याद्रीचा कडा शिवगर्जनांनी दुमदुमला; पाहा खास फोटो

किल्ले रायगडवर साजरा झाला भव्य शिवराज्याभिषेक सोहळा
Shiv Rajyabhishek Sohala Raigad | सुवर्णक्षणांचा साक्षीदार रायगड! सह्याद्रीचा कडा शिवगर्जनांनी दुमदुमला; पाहा खास फोटो

1. छत्रपती शिवाजी महारांच्या मूर्तीजवळील फुलांची सजावट

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही सुंदर सजावट शिवरायांच्या अष्टपैलू आणि दैदिप्यमान व्यक्तित्वाला मानाचा मुजरा अर्पण करते.

2. प्रवेशद्वाराला बांधलेले तोरण 

किल्ले रायगडच्या मुख्य प्रवेशद्वाराला (महादरवाजाला) बांधलेले तोरण हे शिवकाळातील विजय, शौर्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यात किंवा सणाच्या वेळी गडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या तोरणाने प्रवेशद्वाराची शोभा वाढवली जाते.

3. शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक

संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा भव्य राज्याभिषेक करण्यात आला.

4. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुजा करण्यात आली, तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

5. ऐतिहासिक सभामंडपात शिवभक्तांची मांदियाळी

संभामंडपात राजबिंडा वेष, हाती जरीपटक्याची काठी अशा पोषाखात राज्याभिषेकाच्या मिरवणुकीत मावळ्यांचा थाट आणि उत्साह पाहायला मिळाला

6. ऐतिहासिक सभामंडपातील जनसागर

किल्ले रायगड वरील सभामंडप शिवभक्तांची खच्च भरून गेले होते, त्यांच्यात वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता.

7. राज्याभिषेक सोहळ्याला शिवप्रेमींची अलोट गर्दी

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिनी रायगडच्या पवित्र भूमीवर,तिहासिक क्षणाची अनुभूती घेण्यासाठी देशभरातून शिवप्रेमी रायगडावर आले होते. "जय भवानी, जय शिवाजी" आणि "प्रौढ प्रताप पुरंदर..." या घोषणांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला होता

8. शाही तुतारी, भगवा झेंडा...रायगडवर शिवभक्तांचा उत्साह

शाही तुतारीचा ललकार, गगनभेदी गर्जना आणि रायगडाच्या कडेकपाऱ्यांतून फडकणारा शिवरायांचा भगवा झेंडा... संपूर्ण रायगड परिसर आणि आसमंत दणाणून गेला

9. किल्ले रायगडवर लोटलेला शिवसागर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news