

नेरळ : नेरळ विकास संकुल प्राधिकरण अंतर्गत येणार्या ममदापूर ग्रा.पं. हद्दीत प्राधिकरणा अंतर्गत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प व इमारतीची बांधकाम सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी परवानग्या देण्यासाठी विकासनिधीच्या नावाखाली नेरळ विकास संकुल प्राधिकरणाकडून बांधकाम व्यावसायीकांकडून मोठया प्रमाणात पैसा जमा केला जात आहे. तर नागरिसुविधा पुरविण्याच्या नावाखाली ममदापूर ग्रा.पं.कडून नागरिकांकडून कर घेतला जात असताना देखील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ममदापूर ग्रा.पं. हद्दीतील समर्थनगर येथील असलेल्या रस्त्यांच्या दूतर्फा गटारांची व्यवस्था नसल्याने मात्र हे घाण पाणी रस्त्यावर साचल्याने तळ्यांचे स्वरूप आले आहे.
यामुळे येथील नागरिक, अबालवृध्दांसद शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने, त्यांच्यावर या घाणीच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली असुन, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने, नेरळ विकास संकुल प्राधिकरण विभागाचे व ममदापू ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार हा चव्हाट्यावर आला आहे. जर नागरिसुविधा पुरविण्यात नेरळ प्राधिकरण व ममदापूर ग्रामपंचायत सक्षम नसेल तर आम्ही नागरिकांनी कर का? भरावा असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नेरळ विकास संकुल प्राधिकरण अंतर्गत येणार्या नेरळ, ममदापूर व कोल्हारे ग्रा.पं.चा समावेश येत असुन, या तिन ही ग्रामपंचायतीमध्ये नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या माध्यमातून गृहप्रकल्प व इमारतींच्या बांधकामांना देण्यात आलेल्या परवानग्यांनुसार मोठया प्रमाणात गृहप्रकल्प व इमारतींचे बांधकामसुरू आहे.
ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ पोस्ट ऑफिस ते नेरळ विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शाळा या रस्त्त्याच्या दूतर्फा सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था ही इमारतींचे बांधकाम परवानग्या देण्यापोटी विकासनिधीच्या नावाखाली मोठया प्रमाणात पैसाजमा करणार्या नेरळ विकास संकुल प्राधिकरण व नागरिसुविधा पुरविण्याच्या नावाखाली कर वसुल करणार्या ममदापूर ग्रा.पं. यांच्या माध्यमातून करणे क्रमप्राप्त असताना, ती नागरिसुविधा ही होत नसल्याने मात्र समर्थ नगर येथील पावसाचे पाणी व घाण सांडपाणी हे रस्त्यावर साचल्याने व तळी साचल्याचे वास्तव समोर येत असल्याने, येथील नागरिक, अबालवृध्दांसह व नेरळ व नेरळ परिसरातून नेरळ विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे.
या परस्थितीमुळे येथील नागरिकांकडून नेरळ विकास संकुल प्राधिकरण व ममदापूर ग्रामपंचायत प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात असुन, जर नागरिसुविधा पुरविण्यात नेरळ प्राधिकरण व ममदापूर ग्रा.पं. सक्षम नसेल तर आम्ही नागरिकांनी कर का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.