

खोपोली : प्रशांत गोपाळे
सावरोली खारपाडा या मार्गावर सकाळी पाच ते सहा की.मी अंतरावर अज्ञात वाहनातून केमिकल पडल्यामुळे यांचा उग्र वास येत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे दिवसेंदिवस धोक्याचे होत चालले आहे.
परिणामी हा रस्ता येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक होत चालला आहे. या उग्र वासामुळे नागरिक संतप्त झाले असून या वाहनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परिणामी या वासामुळे मळमळ होत असल्याची बोलले जात होते. या मार्गावर औद्योगिक कारणांचे जाळे निर्माण झाल्यामुळे सातत्याने रेलचेल सुरू असते.
विशेष म्हणजे या कारखान्याला लागणारा कच्चा तसेच तयार झालेला माल अवजड वाहनांमध्ये पाठविला जातो. काही वेळा क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरल्यामुळे रस्त्यावर पडत असते. परिणामी या मार्गावर प्रवास करणारे नागरिक कामगार वर्ग यांच्यावर जीवावर बेतू शकते. सदर या रस्त्यावर पडलेला केमिकल कोणता आहे या ते सांगू शकत नसले तरी सुद्धा त्यांचा उग्र वास हा डोकेदुखी ठरत आहे.त्याच बरोबर सकाळी कामगार वर्ग कामासाठी जात असताना वाहन घसरुन किरकोळ अपघात ही घडल्याचे निदर्शनास आले.
यामुळे अशा वाहनावर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्ग करीत आहेत. अशा घटनांमध्ये जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने कार्यवाही करणे गरजेचे आहे. ज्वलनशील, विषारी रसायनाची गळती झाल्यास वाहनचालक व परिसरातील नागरिकांच्या आरोग्या नुकसान होण्याची शक्यता आहे. या गळतीला तात्काळ आळा घालणे आवश्यक आहे.
खालापूर तालुक्यातील प्रत्येक गावावर केमिकल कंपन्यांचा भरणा आहे त्यामुळे मालवाहू वाहतूक ही वाढली आहे, मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोन समोर न ठेवता हे मालवाहू टँकर बेफिकीरपणे मानवी शरीराला घातक पदार्थाची वाहतूक करताना बेजबाबदारपणे कोणताही विचार न करता प्रवास करीत आहेत. नुकताच रस्त्यावर उग्र वासाच्या रस्त्यावर पडलेल्या केमिकलचा नाहक नागरिकांना कामगार वर्गाला झाला आहे. या टँकर व कंपनीचा शोध घेऊन कारवाई करावी ही प्रशासनाला विनंती.
काशीनंतब जाधव, सामाजिक कार्यकर्ते