Savitri river pollution : भंगार विक्रेत्यांमुळे सावित्रीचे पाणी प्रदूषित

प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा
Savitri river pollution
भंगार विक्रेत्यांमुळे सावित्रीचे पाणी प्रदूषितpudhari photo
Published on
Updated on

महाड : सावित्री नदीच्या पात्रात पोलादपूर पासून महाड औद्योगिक वसाहती मधील रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे सावित्री नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली असतानाच त्यामध्ये भंगार विक्रेत्यांनी देखील आता भर घातली आहे. भंगार विक्रेते ग्रामीण भागातून मिळणार्‍या तांब्याच्या वायर सावित्री नदीपात्रात शेडाव नाक्याजवळ जाळण्याचा उद्योग करून नदीपात्रात प्रदूषणाला हातभार घालत असल्याचे सिद्ध होत असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त होत आहेत.

सावित्री नदीपात्रात पोलादपूर पासून येणारे पाणी महाड औद्योगिक वसाहती जवळ असणार्‍या कारखान्याला लागून वाहत असल्याने औद्योगिक वसाहती मधील रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे अगोदरच सावित्री नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे वारंवार सावित्री नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने शेडाव नाक्यापर्यंत असणारा गोड्या पाण्याचा डोह आधीच प्रदूषित झाला आहे.

नदीपात्रा जवळील असणार्‍या अनेक ग्रामपंचायती या आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील कचरा गोळा करून तो सावित्री नदी पात्रा जवळील नदीच्या प्रवाहा जवळ टाकत असल्याने सावित्री नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. हे कमी असताना औद्योगिक वसाहती मधून मोठ्या प्रमाणावरील कंपन्यांचे रसायन मिश्रित सांडपाणी पुराचा पाण्याचा फायदा घेत अनेक कंपन्या दिवसाढवळ्या नाल्यांमधून सोडत असताना त्यावर कारवाई करण्याचे धाडस औद्योगिक विकास महामंडळ दाखवत नसल्याने सावित्री नदी प्रदूषणाला औद्योगिक वसाहती मधूनच हातभार लागत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मात्र याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी का गप्प बसतात असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे भंगार गोळा करून त्यामधील विद्युत तारा नदीपात्रात जाळून त्यामधून ल्युमिनियमच्या तारा व तांब्याच्या तारा वेगळ्या करण्याच्या उद्योगामुळे नदीपात्रात प्रदूषण होऊन विद्युत तारा जाळल्यामुळे त्या प्रदूषणाने त्याची राख नदीपात्रात जाऊन नदीपात्रातील मासे व तक्षम जीवांना धोका निर्माण होत आहे. या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

अ‍ॅॅल्यूमिनिअम,तांब्याच्या तारांसाठी आग

सावित्री नदी अगोदरच प्रदूषित झाली असताना महाड तालुक्यातील गावागावातून भंगार गोळा करून आणणार्‍या भंगार विक्रेत्यांनी देखील सावित्री नदी प्रदूषित करण्यात हातभार लावला आहे गाव खेड्यातून जमा करणार्‍या भंगार मधून अ‍ॅल्युमिनियमच्या व तांब्याच्या तारा जाळून वेगळ्या करण्याचा उद्योग भंगार विक्रेते करीत असल्याचे उघड झाले आहे.

सावित्री नदी पात्रा जवळील शेडाव नाक्याजवळ असणार्‍या नदीपात्रालगत शिरगाव येथील रफिक रद्दीवाला भंगार विक्रेत्याची भंगार गोळा करणारे माणसे या ठिकाणी भंगार विद्युत तारांमधून विद्युत तारा जाळून त्यामधून ल्युमिनियम व तांब्याच्या तारा वेगळा करण्याचा उद्योग करीत असल्याचे उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news