Traffic Police Death Poladpur | पोलादपूरमध्ये साताऱ्यातील वाहतूक पोलिसाने लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपविले

घरगुती कारणातून टोकाचे पाऊल; लॉजच्या खोलीत आढळला मृतावस्थेत
Satara Crime News
जीवन संपविलेPudhari
Published on: 
Updated on: 

Satara Traffic Police Death Poladpur Lodge

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सडवली फाट्यासमोरील काळकाई हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जोगळे लॉजमध्ये मुक्कामी आलेल्या वाहतूक पोलिसाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना शुक्रवारी (दि. २) सकाळी उघडकीस आली. संतोष रामचंद्र ननावरे असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ननावरे हे पुणे-बंगळुरू महामार्गावरील भुईंज येथे वाहतूक पोलिस म्हणून कार्यरत होते. काही घरगुती कारणातून ते ३० सप्टेंबर रोजी पोलादपूर येथे आले होते. त्यानंतर ते जोगळे लॉजमधील खोली क्रमांक चारमध्ये मुक्कामी होते.

Satara Crime News
Raigad News : मुदतबाह्य वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या स्विगी इन्स्टावर कारवाई

शुक्रवारी सकाळी लॉजमधील कर्मचारी ननावरे यांना आंघोळीसाठी पाणी देण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेला. यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने दरवाजा ठोठावून हाका मारल्या. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजालगतच्या खिडकीची काच सरकवून कर्मचाऱ्याने आत डोकावले असता ननावरे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

लॉज कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलादपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक सतीश पवार यांनी घटनास्थळी पाहणी करून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खोलीचा दरवाजा उघडून मृतदेह खाली उतरविण्यात आला.

Satara Crime News
Raigad health infrastructure : माणगावच्या ट्रॉमा केअरला लालफितीचा फटका

महाड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप काळे आणि पोलादपूरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय सुर्वे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news