सलमान खान निवासस्थान फायरिंग प्रकरण: मुख्य आरोपीला अटक

Salman Khan Firing Case | पानिपत येथून पनवेल पोलिसांकडून अटक
 Salman Khan Firing Case  Accused Sukkha
सलमान खान निवासस्थान फायरिंग प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. ANi x Account
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल: बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या  हत्येचा कट रचणे तसेच त्याच्या राहत्या घरावर फायरींग करून सलमान खानला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी हरियाणातील पानिपत येथून अटक केली. सुखा शूटर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगतिले .

१४ एप्रिल २०२४ रोजी काही संशयित आरोपीनी सने अभिनेता सलमान खान यांच्या मुबई येथील राहत्या घरावर फायरींग करून सलमान खान ला मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना घडल्या नंतर मुबई पोलीस तसेच नवी मुबई पनवेल पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली होती. हे दोन आरोपी काही दिवस पनवेल येथे वास्तव्याला आल्याचे समोर आले होते. या दोघांच्या अटके नंतर या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. मात्र, या टोळीचा मुखींया मोस्ट वॉन्टेड आरोपी चा शोध पोलीस घेत होते.

सुख्ख्या शूटर असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, तो पोलिसांना चकवा देण्यात वारंवार यशस्वी होत होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पनवेल शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. बुधवारी पनवेल शहर पोलिसांच्या पथकांनी हरियाणा येथील पानिपत येथून  त्याला अटक केली आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना त्याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे,  पोलीस कर्मचारी किरण सोनवणे,  नितीन वाघमारे यांनी पानिपत येथे जाऊन बुधवारी सुख्ख्या शूटरला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. सुख्खा फायरींग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. इतर सहकार्यांना पैसे, हत्यार पुरवणे त्याच्यावर जबाबदारी होती. सुख्खा याने स्वतः सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊस ची रेखी केली होती. आणि सलमानला रस्त्यातचं गाठून ठार करण्याचा प्रयत्न त्याचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 Salman Khan Firing Case  Accused Sukkha
बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली, 'सलमान खान'चा उल्लेख

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news