Crime News: नवी मुंबईत कारमधून 70 लाखांचे अफीम, गावठी कट्टा पोलिसांनी केले जप्त

अपघात करून चालक फरार, पोलीस तपास सुरू
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

उरण: नवी मुंबईतील पाम बीच रोडवर एका भरधाव एसयूव्ही कारचा अपघात झाल्यानंतर, त्या गाडीतून तब्बल 70 लाख रुपये किमतीचे अफीम आणि एक गावठी कट्टा (पिस्तूल) जप्त करण्यात आल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली.

हा अपघात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पाम बीच रोडवरील एका ट्रॅफिक आयलंडला (चौकाला) धडक बसून झाला. अपघातानंतर राजस्थान पासिंग असलेल्या या अपघातग्रस्त वाहनाचा चालक गाडी घटनास्थळीच सोडून फरार झाला, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भास्कर कोकरे यांनी दिली.

Crime News
Amudan blast victims protest: आमच्या डोळ्यांतले अश्रू कधी पुसणार? बाधितांचा सवाल

पोलीस निरीक्षक कोकरे यांनी सांगितले की, “अपघाताची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा पोलिसांना त्या वाहनातून एक तीव्र उग्र वास येत असल्याचे जाणवले.

Crime News
Thane News: ठाण्यात मृतदेह आढळण्याच्या घटनांमध्ये होतेय मोठी वाढ

संशय आल्याने गाडीची झडती घेतली असता, कारच्या डिक्कीत तीन गोण्यांमध्ये 69 किलोग्रॅम अफीम आढळून आले. तसेच गाडीच्या डॅशबोर्डवर एक लोड केलेला गावठी कट्टाही सापडला.या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news