Roha News | कचरा टाकण्याच्या रागातून रोहा शहरात हाणामारी

परस्परविरोधात फिर्यादी दाखल
Roha News -
Roha News | Clashes in Roha city over garbage dumping
कचरा टाकण्याच्या रागातून रोहा शहरात हाणामारी
Published on
Updated on

रोहा : तालुक्यातील रोहा एस. टी.स्टॅन्ड येथे कचरा टाकण्याचा रागातून मारहाणीची घटना घडली आहे. याबाबत परस्परविरोधात फिर्यादी रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहे.

रोहा पोलीस ठाणे हद्दीत 17 सप्टेंबर रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रोहा एस. टी.स्टॅन्ड जवळ ही घटना घडली आहे. आदर्शनगर- वरसे येथील फिर्यादी हे त्यांचे फ्रुटचे दुकानात असताना तेथे आरोपी या फिर्यादी यांचे दुकानासमोर कचरा कोणी टाकला असे म्हणुन शिवीगाळी करू लागल्याने फिर्यादीनी मी कचरा टाकला नाही, असे म्हणाले. असता या गोष्टीचा व मागील भांडणाचा मनात राग धरून चार आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादी यांना हाताबुक्याने मारहाण करून त्याचे कपडे फाडुन मुख्य आरोपीने फिर्यादीचे गळयातील सोन्याचे चैन तोडुन तसेच चष्मा तोडुन फोडुन नुकसान केले तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादी यांना लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. याबाबत रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह म्हात्रे हे करीत आहेत.

दुसर्‍या फिर्यादित असे म्हटले आहे की, रोहा पोलीस ठाणे हद्दीत 17 सप्टेंबर रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एस. टी.स्टॅन्ड जवळ आरोपीत रा. आदर्शनगन वरसे, ता.रोहा याने फिर्यादी हीचे सरबतचे दुकानासमोर टाकलेला कचरा उचळुन नगरपालिकेच्या गाडीत टाकणेस सांगितले असता त्या गोष्टीचा आरोपीत यास राग येवुन त्याने फिर्यादी सोबत वाद घालुन शिवीगाळी केली. अंगावर मारणेस धावत आल्याने फिर्यादी यांनी त्यास हाताने अडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आरोपी याचे हतात फळ कापण्यासाठी ठेवलेली छोटी सुरी फिर्यादीचे उजवे हाताचे मनगटवर लागुन किरकोळ दुखापत झाली त्यावेळी साक्षीदार हा फिर्यादीस सोडविणेस आला त्यावेळी आरोपीत याने त्याचे हाताचे मुठीची फाइट मारून साक्षीदार यास डाव्या डोळयाचे खाली दुखापत केली तसेच सदर झटपटीत फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची 2 तोळयाची चैन कोठेतरी गहाळ झाली. याबाबत रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह सचिन पालकर हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news