Roha Ganeshotsav 2026 : रोहा तालुक्यातील श्रीगणेशाच्या आगमनाला पारंपरिक वाद्यांची साथ

ढोलकी विक्रेत्यांच्या आगमनाने बाजारपेठेत उत्सवाची लगबग
Roha Ganeshotsav 2026
Roha Ganeshotsav 2026pudhari photo
Published on
Updated on

मेढा : निलेश ठमके

गणेशोत्सवाचे वेध लागताच रोहा शहरात उत्सवाची गडबड आणि उत्साह शिगेला पोहोचला आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच, भक्तांना ताल आणि लयीवर डोलवण्यासाठी ढोलकी व पखवाज विक्रेते रोह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे रोह्याची बाजारपेठ आता पारंपरिक वाद्यांच्या नादाने दुमदुमून जाण्यासाठी सज्ज झाली आहे.

गणेशोत्सवात पारंपरिक गाण्यांच्या परंपरेला कोकणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात सणासुदीला ढोलकीच्या साथीने विविध गाण्यांचे होणारे सादरीकरण ही वेगळीच मजा असते.कोकणात आजही मंगळागौर, गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. रात्रभर घरी होणाऱ्या नाचगाण्यांना ढोलकीची साथ मिळते.

Roha Ganeshotsav 2026
Nanded Crime : कारवाईचा बडगा : नांदेड पोलिसांनी काढली जुगाऱ्यांची वरात

ढोलकी हे आरतीचे एक महत्त्वाचे अंग असल्याचे हेरून विविध भागातील ढोलकी व्यावसायिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी शहरामध्ये भाडेत्तवावर दुकाने घेऊन डेरा टाकतात.तर काही ढोलकी विक्रेते बाजारात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये फिरून ढोलकीचा व्यवसाय करताना पहायला मिळतात.ढोलकी आता आरतीसाठी जवळपास प्रत्येक घरात अविभाज्य भाग होत चालली आहे.

रोहा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये अनेक घरांतून, तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असतो. त्यामुळे बाप्पांची पूजाअर्चा करताना ज्याप्रमाणे टाळ महत्त्वाचे असतात, त्याप्रमाणे आरती म्हणताना ढोलकीचीही गरज अनेकांना वाटू लागते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ढोलकी विक्रेते मोठ्या प्रमाणात शहरामध्ये दाखलअनेक घरांतून, तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असतो.

Roha Ganeshotsav 2026
Raigad Ganeshotsav Traffic : महामार्गावर वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा ‘वॉच’

त्यामुळे बाप्पांची पूजाअर्चा करताना ज्याप्रमाणे टाळ महत्त्वाचे असतात, त्याप्रमाणे आरती म्हणताना ढोलकीचीही गरज अनेकांना वाटू लागते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ढोलकी विक्रेते मोठ्या प्रमाणात शहरामध्ये दाखल होत असून, गल्लोगल्ली ढोलकी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आतापासूनच ठिकठिकाणी शहरात डेरेदाखल झालेले विक्रेते महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशातून ढोलकी आणून आपला व्यवसाय करीत आहेत.

यांची किंमत आकारमानानुसार असून रस्सी ढोलकी, चावी ढोलकी असे ढोलकीचे विविध प्रकार पहावयास मिळतात.गणेशोत्सव आता आठवड्यावर येऊन ठेपल्याने ढोलकी विक्रीही वाढू लागली आहे. विशेष म्हणजे हे ढोलकीवाले ठिकठिकाणी गावागावांतून फिरू लागले आहेत. लहान मुलांना देखील त्यांचे अधिक आकर्षण वाटत आहे.

इलेक्ट्रॉनिकच्या जमाना असला तरी कोकणात आजही पारंपरिक गाणी गाण्याची कला जोपासली जाते. गणेशोत्सवातील आरती व पारंपरिक गाणी गाण्यांसाठी ढोलकीचीच साथ लागते. रस्सी ढोलकी,चावी ढोलकी असे ढोलकींचे विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध असून ढोलकीचे आकारमान व प्रकारानुसार १५०० पासून ते ५००० पर्यंत ढोलकी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

चैतन्य साळुंखे, ढोकली विक्रेता, पंढरपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news