अलिबाग : रमेश कांबळे
रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलिस स्टेशन हद्दीतील तिनविरा धरणानजिक दीड कोटीचा दरोडा टाकण्यात आला होता. या गुन्ह्यातील दीड कोटी रुपयांची रक्कम सांगली आटपाडी येथून जप्त करुन आणखी दोन आरोपींना रायगड पोलीसांनी अटक केली असून आता आरोपींची एकूण संख्या सहा झाली आहे.
कमी किमतीत सोने देतो सांगून दिड कोटी रुपये लपास करण्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, आरोपींनी 1 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक करून लंपास केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपी समाधान पिंजारी आणि त्याचा सहकारी दीप गायकवाड यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या कटात तीन पोलीस अंमलदारांचाही सहभाग असून त्यापैकी विकी साबळ व समीर म्हात्रे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.तर समाधान पिंजारी याचा भाऊ विशाल पिंजारी व इको चालक (एम एच 01ए- 1126) अक्षय खोत (दोघेही राहणार आठपाडी, सांगली) यांच्याकडून दीड कोटी रुपयांची रक्कम गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.10) जप्त केली असल्याची माहिती रायगड गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,15 दिवसांपूर्वी समाधान पिंजारीने त्याच्या मूळगावातील व्यवसायिक नामदेव हुलगे यांना कमी किमतीत 7 किलो सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे नामदेव हुलगे यांनी आपल्या नातेवाईक ओमकार वाकशे यांना याची माहिती दिली. दोघांनी मिळून 1 कोटी 50 लाख रुपये गोळा केले आणि 4 फेब्रुवारी रोजी अलिबागकडे रवाना झाले होते.येथे आल्यावर पोलीस चेकींगचा बनाव करुन दिड लाखाची रकक्कम लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी कसून तपास करण्यात येत असून अन्य एका फरार आरोपींच्या मागावर तपास पथक गेले आहे.

