उरणच्या वायु विद्युत प्रकल्पात जास्तीत जास्त वीजनिर्मितीची आवश्यकता

टर्बाईनकडे दुर्लक्ष केल्याने वर्बनिर्मिती कमी; संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करा; मनसेची मागणी

Requirement of maximum power generation in wind power plant of Uran
उरणच्या वायु विद्युत प्रकल्पFILE
Published on
Updated on

जेएनपीए : विठ्ठल ममताबादे

उरण तालुक्यात गँसवर चालणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प हा एकमेव सरकारी उपक्रम आहे. या प्रकल्पातील सहा संचातून 672 मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकत असताना या प्रकल्पातील नादुरुस्त असलेल्या ब्लाँक मधील 2 बाँयलर आणि 1 स्टीम टरबाईनकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने सध्या वीजनिर्मिती कमी होत.

वायु विद्युत प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून सदर प्रकल्पाची पाहणी करून अशा अकार्यक्षम मुख्य अभियंत्यांच्या जागेवर कार्यक्षम मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. देशातील पहिले नैसर्गिक वायू पासून वीजनिर्मिती करणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प उरण तालुक्यात असून या प्रकल्पाची स्थापना 1983-84 साली करण्यात आली आहे.

संपूर्ण जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या वायु विद्युत केंद्राची स्थापित क्षमता 952 मेगावॉट होती. या प्रकल्पातील सहा संचातून 672 मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र काही वर्षांत गॅस पासून वीज निर्मित करणार्‍या संचाची कार्यक्षमता ही या प्रकल्पात येणार्‍या मुख्य अभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कमी होत चालली आहे. त्यातच अशा मुख्य अभियंत्यांमुळे आगी लागल्याच्या घटना बरोबर वीजनिर्मिती प्रकल्पात या अगोदर 9 ऑक्टोबर 2022 रोजी मोठा स्फोट होऊन एक अभियंता, दोन कामगार होरपळून मृत्यू पडल्याची व दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. अशा प्रकारची दुदैवी घटना सदर प्रकल्पात घडल्यानंतर ही प्रकल्पातील मुख्य अभियंता मोहन आव्हाड हे मेंटेनन्स विभागातील कामगारांकडून सदर बाब ही निदर्शनास आणून देऊन ही प्रकल्पातील नादुरुस्त 2 बाँयलर आणि 1 स्टीम टरबाईनच्या कामाकडे वारंवार दुर्लक्ष करत असतील तर या प्रकल्पात 2022 साली ज्या प्रकारे मोठा स्फोट झाला त्या स्फोटाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही अशी भीती स्फोटाची तीव्रता अनुभवलेले कामगार तसेच परिसरातील रहिवाशी व्यक्त करत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा हे खाते असल्याने त्यांनी उरण तालुक्यातील वायू विद्युत केंद्र प्रकल्पाची पाहणी करून वीज पुरवठ्या अभावी 12 ऑक्टोबर रोजी अंधारात गेलेल्या मुंबई शहराची वीजेची वाढती गरज लक्षात घेऊन सदर वायु विद्युत प्रकल्पात जास्तीत जास्त मेगावॉट वीजनिर्मिती कशाप्रकारे करता येईल. यासाठी पुढाकार घ्यावा तसेच वायु विद्युत केंद्र उरण या प्रकल्पाचे अकार्यक्षम अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करावी. नाहीतर अकार्यक्षम अभियंत्यांच्या डोळेझाक कारभारामुळे सदर प्रकल्पात 2022 च्या स्फोटाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.

अ‍ॅड. सत्यवान भगत, अध्यक्ष, उरण तालुका मनसे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news