Ruddy Breasted Crake Bird: कर्नाळ्याच्या जंगलात दुर्मिळ 'रुडी-ब्रेस्टेड क्रेक'ची चाहूल; पक्षीप्रेमींची पावले अभयारण्याकडे

पुन्हा एकदा पक्ष्यांचा किलबिलाट
Ruddy Breasted Crake Bird
Ruddy Breasted Crake BirdPudhari
Published on
Updated on

खांदा कॉलनी: मुंबई-गोवा महामार्गालगतच्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात सध्या दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या रुडी-ब्रेस्टेड क्रेक या पाणथळ अधिवासातील पक्ष्याचे दर्शन घडत आहे. अतिशय लाजाळू स्वभावामुळे सहज न दिसणाऱ्या या पक्ष्याचे छायाचित्र टिपण्यात यश आल्याने पक्षीनिरीक्षक आणि वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तांबूस डोके व मान, तपकिरी शरीर, पोटाजवळील काळ्या-पांढऱ्या आडव्या पट्ट्या आणि लांब बोटे ही या पक्ष्याची वैशिष्ट्ये आहेत. दलदली, ओढे, पाणथळ गवताळ प्रदेश आणि दाट झुडपांमध्ये तो वास्तव्य करतो. धोका जाणवताच क्षणार्धात गवतामध्ये अदृश्य होण्याची त्याची सवय असल्याने त्याचे निरीक्षण करणे आव्हानात्मक मानले जाते.

Ruddy Breasted Crake Bird
Karjat Resort Booking Scam: पर्यटनाला ऑनलाईन फसवणुकीचा विळखा; बनावट सोशल मीडिया पेज, खोटे एजंट आणि आकर्षक ऑफर्सचे आमिष

पावसाळ्यात कर्नाळा अभयारण्यातील जलस्रोत, ओलसर जमीन आणि वाढलेले गवत या पक्ष्यास पोषक अधिवास उपलब्ध करून देतात. कीटक, गोगलगायी, लहान जलचर आणि बिया यांवर तो उपजीविका करतो. पर्यावरणातील अन्नसाखळी टिकवून ठेवण्यातही या पक्ष्याचे महत्त्वाचे योगदान आहे.

पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार माधव आठवले यांनी सांगितले की, कर्नाळा अभयारण्यातील समृद्ध जैवविविधतेचे हे आणखी एक उदाहरण आहे. दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन ही निसर्गप्रेमींसाठी पर्वणी असली, तरी त्यांच्या अधिवासात कोणताही व्यत्यय न आणता सुरक्षित अंतरावरून निरीक्षण व छायाचित्रण करणे आवश्यक आहे.

Ruddy Breasted Crake Bird
Rice Plantation Season: पिढी बदलली तरी बालपण तेच-पाऊस, चिखलात मस्‍ती; ग्रामीण भागात अजूनही जिवंत आहे "मातीचं सुख"

वन्यजीव अभ्यासकांच्या मते, अशा दुर्मिळ पक्ष्यांची नियमित नोंद होत राहिल्यास कर्नाळा अभयारण्यातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल. पावसाळ्यात कर्नाळ्याचे जंगल पुन्हा एकदा पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि दुर्मिळ प्रजातींच्या वावराने समृद्ध झाल्याचे या दर्शनातून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news