Raigad Crime : मतीमंद पिडीत मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीस 10 वर्षे कारावास

दुचाकीवर जबरदस्तीने बसवुन आय ओ.सी कंपनीच्या मागे असलेल्या झाडी झुडपात नेवुन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.
Raigad Crime |
Raigad Crime : मतीमंद पिडीत मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीस 10 वर्षे कारावासFile Photo
Published on
Updated on

पनवेल ः अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन पनवेल न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासासह 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.लिंगाप्पा मत्लया पुजारी असे आरोपीचे नाव आहे.

लिंगाप्पा मल्लया फुजारी हा अल्पवयीन पिडीत मुलीच्या शेजारी राहत होता. सदर पिडीता अल्पवयीन व मतीमंद असल्याची आरोपीस माहिती होती. असे असताना पिडीत मुलगी खोपोली येथे पातळगंगा नदीवरून कपडे धुवुन घरी परत येत असतांना लिंगाप्पा मल्लया पुजारी यांने अल्पवयीन पिडीत मुलीला त्याचे ताब्यातील दुचाकीवर जबरदस्तीने बसवुन आय ओ.सी कंपनीच्या मागे असलेल्या झाडी झुडपात नेवुन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.

Raigad Crime |
Mahad water shortage : महाड शहरावर पाणीटंचाईचे सावट

सदर प्रकार पिडीतेच्या आईला समजल्यानंतर पिडीतेच्या आईने लगेचच सदर फिर्याद दालत केली. त्यानंतर फिर्यादी व पिडीता यांचे जबाब नोंदविण्यात आले तसेच सदर घटनेचा वेळी हजर असणा-या महिलांचे देखील लेखी जबाब नोदविण्यात आले. त्यामुळे आरोपीविरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तपासाअंती सदर गुन्हयाचे कामी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आणि पनवेल येथिल विशेष पोक्सो न्यायालयात सदर सटल्याची सुनावणी पूर्ण झाली.

याकामी सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील, प्रतिक्षा बडे वारंगे यांनी काम पाहिले. सरकारपक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीता, पिडीतेची आई. शेजारील महिला यांची साक्ष तसेच तपासिक अधिकारी ए.पी. आय. कल्याणी पाडोळे यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच कोर्ट पैरवी वंदनाराठोड आणि स्वप्निल पानसरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Raigad Crime |
Hetawane dam water tunnel project : हेटवण्याच्या जलबोगद्याने विहिरीच आटल्या

सदर खटल्याचेकामी विशेष सरकारी वकील, प्रतिक्षा वडे वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून . न्यायालयाने लिंगप्पा मल्लया पुजारी, याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एकूण रक्कम रु. 1,00,000/- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news