Raj Thackeray at SP meeting : शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

2 ऑगस्टला पनवेलला वर्धापन दिन सोहळा, कार्यकत्यार्र्ंकडून मेळाव्याची जोरदार तयारी
Raj Thackeray at SP meeting
शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणारछाया - रमेश कांंबळे
Published on
Updated on

अलिबाग ः शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने शनिवारी (दि.02) सकाळी दहा वाजता, नवीन पनवेल येथे पक्ष सदस्यांचा मेळावा होणार आहे. शेकाप सरचिटणीसहसह अन्य दिग्गज मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाधडाणार आहे.ते नेमके काय बोलतात याची सर्वानाच उत्सुकता लागली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त होणार्‍या मेळाव्याची तयारी झाली आहे. गावोगावी, शहरी भागात ठिकठिकाणी कार्याकर्त्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमधून कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेकापचा वर्धापन दिन तथा मेळावा हा कार्यकर्त्यांना उमेद देणारा आहे. त्यामुळे या मेळाव्यात सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांची संख्यादेखील प्रचंड असणार आहे.

या मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य खजिनदार अतूल म्हात्रे, शेकाप सोशल मिडीया प्रमूख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप सहचिटणीस अ‍ॅड. गौतम पाटील आदी दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी जोरात सुरु केली आहे.

महिला, तरुण, युवक, ज्येष्ठ अशा सर्वच कार्यकर्त्यांना हा मेळावा एक वेगळी शक्ती, उमेद देणारा असणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. या मेळाव्यातून मिळालेली विचारांची शिदोरी घेऊन कार्यकर्ता एक वेगळ्या उमेदीने निवडणूकांसाठी कामाला लागणार आहे. त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी दिली. यावेळी तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते.

शिंदे शिवसेना हाच प्रमुख राजकीय शत्रू

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लाल बावट्याखाली लढवणात आहोत आमचा एक नंबर चा शत्रू हा शिंदे गट आहे. निवडणूक लागल्यानंतर आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. असे चित्रलेखा पाटील ह्यांनी सांगितले. सध्याचे राजकरण हे नको त्या विषयावर सुरू आहे स्थानिकांचे प्रश्न सोडवायला कोणालाही वेळ नाही आहे. शेकाप हा सामान्य जनतेच्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे. तेही त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news