मुसळधार पावसाने रेल्वे वाहतूक खाेळंबली

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प !
Railway traffic stopped due to the landslide collapse
दिवाणखवटी येथे दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प.Pudhari File Photo
Published on
Updated on

रायगड : कोकण रेल्वेच्या खेड जवळील दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक थांबविण्यात आली आहे. खेड जवळ एक रेल्वे तर विन्हेरे रेल्वे स्थानकात गांधीधाम नागरकोईल ही गाडी थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Railway traffic stopped due to the landslide collapse
मोदी एक्सप्रेस १८०० प्रवाशांसह कोकण रेल्वे मार्गावर

या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून देखील अधिकृतपणे याची माहिती देण्यात आली असून या बोगद्यासमोरील दरडीचा भाग काढण्यासाठी किमान दोन तासाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान विल्हेरे रेल्वे स्थानकावर उभे असलेल्या रेल्वेतील प्रवाशांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताटरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेऊन चहापाणी व नाश्त्याची व्यवस्था केली. विन्हेरे गावातील अनेक नागरिक या ठिकाणी रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी आल्याचेही दिसून आले.

Railway traffic stopped due to the landslide collapse
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर!! कोकण रेल्वे मार्गावर धावणार मँगो स्पेशल ट्रेन

कोकण रेल्वे मार्गावर झालेल्या या घटनेचे वृत्त समजताच महाडचे आमदार भरत गोगावले यांनी स्थानिक शिवसैनिकांना तातडीने रेल्वेतील प्रवाशांची व लहान मुलांच्या संदर्भात काळजी घेण्याचे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news